Share

केस धुण्याआधी लक्षात ठेवा ‘या’ महत्वाच्या गोष्टी, जाणून घ्या

केसांचं पोषण होणं गरजेचं आहे. अनेकदा पोषण न झाल्यानं केस गळण्यासारखे प्रकार समोर येतात. त्यामुळे केसांची काळजी घेणं गरजेचं आहे. अनेकदा केस धुतल्यानंतर केसांना कंडिशनिंग केलं जातं. पण जेवढ केस धुतल्यानंतर केसांचं पोषण होणं गरजेचं आहे. तितकच केस धुण्याच्या आधीही त्याचं पोषण होणं गरजेचं आहे. अनेकदा केस धुण्याआधी केसांना तेलाने मसाज केला जातो. तेल लावल्याने केस चमकदार होतातच त्याचबरोबर त्यांना पुरेसे पोषणही मिळते. त्यामुळे केस धुण्याआधी काही टिप्स लक्षात ठेवणे गरजेचं आहे.

  • एरंडेल, ऑलिव्ह किंवा बदाम यापैकी दोन प्रकारचे तेल एकत्र करून लावण्यासोबत त्यात ई व्हिटॅमनची कॅप्सूलही घालता येईल. यामुळे केसांना पोषण मिळेल आणि केस गळणेही थांबेल. केसांच्या आरोग्यासाठी या मिर्शणाने कमीत कमी २0 मिनिटे मसाज करा.
  • केस धुण्यासाठी कडकडीत पाणी वापरू नका. गरम पाण्यामुळे तुमचे केस कडक आणि कोरडे होतील.
  • अंघोळीआधी केसांना दही आणि अंडं यांचे मिर्शण लावता येईल. हे मिर्शण कंडिशनर म्हणून काम करते. हे सर्वोत्कृष्ट नैसर्गिक कंडिशनर मानले जाते.
  • मध आणि दही यांचे मिर्शणही कंडिशनर म्हणून वापरता येईल.
  • निस्तेज आणि कोरडे केस चमकदार करण्यासाठी दोन केळी कुस्करून त्यात मायोनिझ सॉस आणि ऑलव्ह ऑईल घाला. हे मिर्शण तासभर केसांना लावून ठेवा. केळामुळे केस चमकदार आणि मुलायम होतील.
  • काळी डाळ भिजवून ठेवा. सकाळी डाळ वाटून त्यात एक अंडं, लिंबाचा रस आणि दही घाला. मिर्शण केसांना लावून अर्धा तास वाळू द्या. यामुळेही केसांचे चांगले पोषण होईल.

महत्वाच्या बातम्या – 

आरोग्य मुख्य बातम्या विशेष लेख

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon