तुळशीच्या चहामधील अँटिऑक्सिडंट्स अनेक आजार टाळण्यास मदत करतात. हा चहा बनवण्यासाठी तुळशीच्या ताज्या पानांचा वापर करावा.चला तर जाणून घेऊया तुळशीच्या चहाचे काही फायदे….
रक्तदाब – हा चहा पिल्याने रक्तप्रवाह चांगला होतो आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो.
दमा – या चहामध्ये अँटिबॅक्टेरियल गुण असतात. ते दमा टाळण्यास मदत करतात.
सुंदर त्वचेचे रहस्य आपल्या घरातच… त्या रहस्याचं नाव आहे… ‘कढीपत्ता’
प्रतिकारशक्ती – हा चहा पिल्याने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि आजारांपासून बचाव होतो.
संधिवात – यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुण असतात. त्याचा संधिवातामध्ये फायदा होतो.
निरोगी त्वचा – यामधील अँटिऑक्सिडंट्समुळे त्वचा कोमल आणि उजळ बनवण्यास मदत मिळते.
जाणून घ्या अक्रोडचे गुणकारी फायदे
मधुमेह – हा चहा पिल्यास ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते व मधुमेह होत नाही.
संसर्ग – तुळशीच्या चहामधील अँटी मायक्रोबियल गुणधर्म संसर्ग होऊ देत नाही.
डोळे – तुळशीच्या चहामधील व्हिटॅमिन ए डोळ्यांची शक्ती टिकवून ठेवण्यास मदत करते.
कॅन्सर – तुळशीच्या चहामधील फ्लेवोनॉइड्स कॅन्सर टाळण्यास मदत करतात.
हृदयविकार – तुळशीचा चहा कोलेस्टेरॉल लेव्हल कमी करतो. त्यामुळे हृदयविकार टाळता येतो.
अशी घ्या काळवंडलेल्या अंडरआर्म्सची काळजी https://t.co/eYPMepE3O5
— KrushiNama (@krushinama) February 10, 2020