इस्रायली तंत्रज्ञानाने शेतकऱ्याने केली पिवळ्या कलिंगडाची यशस्वी लागवड

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुका हा भातशेतीसाठी प्रसिद्धआहे हे तर आपल्याला माहीतच आहे. येथे सर्वात जास्त पिकवला जाणारा ‘वाडा कोलम’ तांदळाला देशात चांगली मागणी आहे. पण येथे शेतकऱ्यांचे भातशेतीचे अर्थिक गणित कोलमडले व त्यामुळे शेतकरी हे दुसऱ्या लावगडीकडे वळत आहेत. वाडा तालुक्यातल्या देवघर गावातील प्रफुल्ल पाटील ह्या तरुण शेतकऱ्याने आपल्या पाच एकर जमिनीत पिवळ्या कलिंगड लागवडीचा प्रयोग केला आहे. शेतकऱ्याने लागवड केलेल्या कलिंगडामध्ये दोन प्रकार आहेत. एका कलिंगडाची साल पिवळी आणि आतील गर लाल आहे आणि  दुसरे हिरवी साल आणि पिवळा गर आहे.

रात्री झोपण्यापूर्वी सॉक्समध्ये कांद्याचा तुकडा ठेवल्याने होतात विविध फायदे, जाणून घ्या

या कलिंगडाने ग्राहकांना खूप आकर्षित केले आहे. याचा रंग कमी हा खूप आकाशात करत आहे. या पिकासाठी कमी साधने आणि कमी खर्च लागतो. प्रफुल्ल हे आपल्याला  कसे मिळवता येईल यासाठी ते ठिकठिकाणच्या प्रयोगशील शेतीची पाहणी करून नवनव्या तंत्रज्ञानाची माहिती घेत होते. अशातच ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मागील वर्षी शेतकऱ्यांना शेतीच्या अभ्यासासाठी इस्राईलला पाठवले आणि त्या गटात जाण्याची संधी त्यांना मिळाली. इस्राईलमधील शेतीचे तंत्रज्ञान पाहून त्यांनी मायदेशी परतल्यानंतर सोसायटीकडून कर्ज घेतले, कुटुंबीयांचे दागदागिनेही गहान ठेवले. त्या पैशातून त्यांनी पाच एकर शेतीला ठिबक सिंचनाची व्यवस्था केली. त्याबरोबरच नेटशेड उभारून त्यात मिर्चीचीही लागवड केली आहे. तसेच यातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळणार असल्याने अनेक शेतकरी व कृषी विभागाचे अधिकारी प्रयोग पाहण्यासाठी येत आहेत.

टाचांच्या भेगा कमी करण्यासाठी नक्की करा हे घरगुती उपाय

कलिंगडाचे पीक घेताना बदामी व चौकोनी आकाराची कलिंगड साच्याच्या सहाय्याने तयार करण्याचा मानस त्यांचा आहे. अशाप्रकारच्या विविध आकारातील कलिंगडांना बाजारमूल्य चांगले मिळणार आहे. हे कलिंगड नवीन असल्याने त्याला चांगली मागणी आहे.

महत्वाच्या बातम्या –

जाणून घ्या, आरोग्यदायी फळ कारल्याचे फायदे

हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्याने केली ‘अफू’ची शेती; दीड हजार झाले जप्त

कर्जमुक्ती योजनेसाठी शेतकऱ्यांच्या याद्या ह्या कुठे आणि कधी पाहायला मिळतील ; घ्या जाणून …..