सब्जाचं सेवन केल्याने शरीरात होत असलेला दाह कमी करण्यास मदत होते. सब्जा आपल्या शारीरिक विकासासोबतच मानसिक विकासासाठीही लाभदायक ठरतो. सब्जामध्ये कॅलरीज, प्रोटिन, कार्बोहायड्रेट, विटॅमिन ए, के, ई, बी, मॅग्नेशियम, फायबर, कॅल्शियम आणि पोटॅशियम असतं.
बद्धकोष्ठतेचा त्रास – बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास सब्जा गुणकारी ठरतो. सब्जा शरीरातील डिटॉक्सिफिकेशनच्या प्रक्रियेत मदत करते आणि पोट, पचन क्रिया सुरळित करुन आतड्यांचे कार्य चांगले ठेवते. गरम पाण्यात सब्जा भिजवून रोज रोत्री दुधासोबत घेतल्याने फायदा होतो. सब्जामुळे गॅससंबंधी समस्या दूर होण्यास मदत होते.
आवळा सरबत पिल्याने दूर होतात हे १० आजार
केसांसाठी फायदेशीर -प्रदूषणामुळे केस निर्जीव होतात. सब्जात असणारी विटॅमिन, लोह, प्रोटिन अशी पोषक द्रव्ये केसांसाठी उपयोगी ठरतात. तेलात सब्जा भिजवून लावल्याने केस चमकदार होण्यास मदत होते.
वजन कमी करते -सब्जा वजन कमी करण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. सब्जामध्ये अल्फा-लिनोलेनिक अॅसिड असतं. यामुळे शरीरातील पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. सब्जामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतं त्यामुळे भूक नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
जाणून घ्या आंबा खाण्याचे फायदे आणि तोटे
त्वचा -प्रदूषणामुळे त्वचेवर मोठा परिणाम होत असतो. परंतु सब्जा त्वचेला ठीक करण्यासाठी फायदेशीर ठरतो. नारळाच्या तेलात सब्जा भिजवून त्याने त्वचेवर मसाज करा. त्यामुळे त्वचा तजेलदार होण्यास मदत होते.
अस्थमावर घरगुती पद्धतीने करा इलाज https://t.co/DYzQKVdhOs
— KrushiNama (@krushinama) January 19, 2020