अस्थमावर घरगुती पद्धतीने करा इलाज

अस्थमाचं सर्वात प्रमुख कारण आनुवंशिकता हे आहे. वायु प्रदूषण, अॅलर्जी, तंबाखूचा धूर, इत रासायनिक पदार्थ हेदेखील अस्थमाच्या प्रमुख कारणांमध्ये सामिल आहे. विविध कारणांमुळे होणाऱ्या अस्थमाचे अनेक प्रकार असतात. अडल्ट ऑनसेट अस्थमा, एलर्जिक ऑक्यूपेशनल अस्थमा, व्यायामुळे होणारा अस्थमा, गंभीर अस्थमा असे अस्थमाचे विविध प्रकार आहेत. जुनाट अस्थमावर सहसा सतत औषधांनी इलाज केला जातो.

अस्थमा असलेल्या रुग्णांपैकी गंभीर अस्थमा असलेल्या रुग्णांची संख्या जवळपास ८ ते १० टक्के इतकी आहे. भारतात लोकसंख्येच्या जवळपास १५ ते २० टक्के लोकांना म्हणजेच जवळपास ३ कोटी लोकांना अस्थमाची समस्या होत आहे. येणाऱ्या काही वर्षात वाढत्या प्रदूषणाचा स्तर आणखी अस्थमाग्रस्तांच्या संख्येत लाखोंच्या संख्येत वाढ होण्याचा धोका वर्तवण्यात आला आहे.

मध आणि मनुके आरोग्यास लाभदायक

ओवा –

पाण्यात ओवा टाकून त्याला चांगले उकळवून त्याची वाफ घेतल्यानेही सुरुवातीच्या काळात फायदा होतो.

आले – 

आल्याच्या गरम चहामध्ये दोन लसणाच्या पाकळ्या टाकून सकाळी, संध्याकाळी प्यायल्यानेही फायदा होतो.

मेथी – 

मेथी पाण्यात उकळून घ्या. त्यात आल्याचा रस आणि मध टाकून पियाल्याने अस्थमाच्या समस्येपासून फायदा होतो.

आठवड्यात ३ ते ४ वेळा मासे खाणं आरोग्यास लाभदायक

शेवग्याची पाने –

पाण्यात शेवग्याची पानं टाकून उकळून घ्या. पाणी थंड झाल्यावर त्यात मीठ, काळीमिरी पावडर आणि लिंबू रस टाकून प्यायल्याने अस्थमाच्या समस्येवर अतिशय गुणकारी ठरतो.

लसून – 

अस्थमा, दम्यासाठी लसून अतिशय उपयुक्त आहे. ३० मिली दूधात लसणाच्या पाच पाकळ्या उकळून घ्या. हे मिश्रण रोज सेवन केल्याने दम्याच्या सुरुवातीच्या अवस्थेत अतिशय फायदा होतो.

मध – 

दम्यासाठी मध अतिशय गुणकारी मानला जातो. दमा असलेल्या रुग्णाच्या नाकाच्या खाली थोडं मध ठेवावे. श्वास घेताना हवा मधाच्या संपर्कात येते. त्यावेळी श्वासावाटे हवा आत घेताना मधामुळे दम्याच्या झटक्यापासून आराम मिळतो.

लवंग –

४ ते ५ लवंग १२५ मिली पाण्यात ५ मिनिटांपर्यंत उकळवा. हे मिश्रण गाळून त्यात मध टाकून हा गरम काढा रोज दोन ते तीन वेळा पियाल्याने फायदा होतो.