अननस चवीला जितकं चविष्ट असतं तितकेच त्याचे फायदे अतिशय गुणकारी असतात.अननस खाणं, अननसचा ज्यूस पिणं फायदेशीर ठरतं. अननसमुळे शरीरातील अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. अननस खाण्यामुळे शरीराला उर्जा मिळते. जाणून घ्या अननस खाण्याचे जबरदस्त फायदे.
-अननसमध्ये ब्रोमेलॅन एंजाइम असतं. त्यामुळे पचनक्रिया सुरळित राहते. अननसमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतं जे डायजेशन सिस्टम दुरुस्त करते.
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी उपयुक्त फळे
-अननसमध्ये मोठ्या प्रमाणात सी विटॅमिन असतं. त्यामुळे त्वचा हेल्दी होण्यास आणि चेहऱ्यावर येणारे पिंपल्स जाण्यास मदत होते. अननस खाल्याने त्वचा अनेक काळापर्यंत तजेलदार राहते. तसंच चेहऱ्यावरील डाग जाण्यासही मदत होते.
-अननसमध्ये असणारं कॅल्शियम आणि मॅगनीज हाडांना मजबूत बनवण्याचं काम करतं. अननसमध्ये मोठ्या प्रमाणात मॅगनीज असतं. एका कपभर अननसमध्ये ७३ टक्के इतकं मॅगनीज असतं.
जाणून घ्या आंबा खाण्याचे फायदे आणि तोटे
-हिरड्या आणि दात मजबूत ठेवण्यासाठी अननस प्रभावी ठरतं. हिरड्यांना आलेली सूज कमी करण्यासाठी अननसाचा रस अतिशय प्रभावी मानला जातो.
-अननसमधील अॅन्टी-इन्फ्लेमेंट्री गुण अतिशय फायदेशीर असतात. हाता-पायाला काही लागल्यास येणारी सूज कमी करण्यास अननस मदत करते. संधिवातामुळे आलेली सूज करण्यासाठी तसंच हाडं मजबूत करण्यासाठी अननस गुणकारी ठरतं.
जाणून घ्या सब्जा खाण्याचे गुणकारी फायदे https://t.co/WdNv2EFKFA
— KrushiNama (@krushinama) January 19, 2020