हिरव्या भाज्या नेहमीच शरीरासाठी, आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असतात. हिरव्या भाज्यांचे नियमित सेवन अनेक आजारांपासून दूर ठेवते. शरीर बळकट बनवते. परंतु या सर्व हिरव्या भाज्यांमध्ये काही भाज्या अशा आहेत ज्या अगदी कमी वेळेत अधिक परिणामकारक ठरतात. कंटोळी (कर्टुल) ही अशीच शरीरावर वेगाने चांगला परिणाम करणारी भाजी आहे.
आल्याचं सेवन आरोग्यासाठी लाभदायक
पचनक्रिया सुधारते –
कंटोळीची भाजी खायची नसल्यास त्याचं लोणचंही तयार करता येतं. आयुर्वेदात अनेक रोगांवर याचा औषध म्हणूनही उपयोग केला जातो. पचनक्रिया सुधारण्यासाठी कंटोळी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
अॅन्टीअॅलर्जिक –
कंटोळीत अॅन्टी अॅलर्जन आणि एनाल्जेसिक सर्दी-खोकल्यापासून बचाव करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. नेत्ररोग, हृदयरोग तसेच कर्करोगाच्या रूग्णांसाठीही कंटोळीचे सेवन फायदेशीर ठरते.
जाणून घ्या गुलकंद खाण्याचे फायदे
वजन कमी करते –
कंटोळीत प्रोटीन, लोह भरपूर आणि कॅलरी कमी प्रमाणात असतात. १०० ग्रॅम कंटोळीच्या भाजीतून १७ कॅलरीज मिळतात. त्यामुळे वजन कमी करणाऱ्यांसाठी कंटोळी उत्तम पर्याय आहे.
उच्च रक्तदाब –
कंटोळीत असणारे मोमोरडीसिन तत्व आणि फायबर शरीरासाठी रामबाण आहे. मोमोरडीसिन तत्व अॅन्टीऑक्सीडेंट, अॅन्टीडायबिटीज आणि अॅन्टीस्ट्रेसचे काम करते तसेच वजन आणि उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
आल्याचं सेवन आरोग्यासाठी लाभदायक pic.twitter.com/WzFHVETvgb
— KrushiNama (@krushinama) January 22, 2020