कलियुगातही वरदान ठरणाऱ्या तुळशीच्या पानांचे फायदे, जाणून घ्या फक्त एका क्लीकवर….

तुळशीचं रोप हे बहुधा सर्व घरात आढळतं, पण समोर असूनही अनेकदा याच्या गुणांकडे आपलं थोडं दुर्लक्षच होतं की, ही एक आयुर्वेदीक औषधी आहे, जी बाजारात मिळणाऱ्या औषधांपेक्षा स्वस्त आणि दुष्परिणाविरहीत आहे. चला जाणून घेऊया तुळशीच्या चमत्कारिक फायद्यांबाबत

तोंडाची दुर्गंधी करतं दूर (Prevents Bad Breath)

तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी तुळशीची पानं खूप मदत करतात. ही एक प्रकारे नैसर्गिक माऊथ फ्रेशनरचं काम करतात. जर तुमच्या तोंडातून दुर्गंधी येत असेल तर तुळशीची काही पान पाण्यात उकळून घ्या आणि मग पाणी थंड करून त्याने चूळ भरा. असं केल्यास तोंडाची दुर्गंधी दूर होईल.

स्कीन इन्फेक्शनपासून सुटका (Prevents Skin Infection)

कोणत्याही प्रकारच्या स्कीन इन्फेक्शनला रोखण्यासाठी तुळशीेपेक्षा चांगली औषधी नाही. खरंतर, तुळशीची पानंही अँटी बॅक्टेरिअल असतात. जी बॅक्टेरियाची वाढ रोखतात. ज्यामुळे इन्फेक्शनवरील उपचाराला मदत मिळते. जर तुम्हालाही कोणत्या प्रकारचं स्कीन इन्फेक्शन असेल तर त्या स्कीन इन्फेक्शनवर बेसनासोबत तुळशीच्या पानांची पेस्ट बनवून स्कीनवर लावावी, नक्कीच फायदा होईल.

सर्दी -खोकल्यावर गुणकारी (Good For Cold)

तुळस सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय आहे. ऋतू बदलल्यामुळे अनेकांची तब्येत लगेच बिघडते. औषध घेतल्याने ताप कमी होतो पण खोकला आणि कफ बराच काळ तसाच राहतो. अशावेळी तुळशीच्या काढ्यासारखा घरगुती उपाय केल्यास नक्कीच आराम मिळतो.

नुकत्याच एका संशोधनानुसार तुळशीला तणाव दूर करण्याचा प्रभावी प्राकृतिक उपाय मानण्यात आलं आहे. खरं पाहता तुळशीच्या पानांमध्ये अँटी स्ट्रेस एजंट आढळतात जे आपल्यावरील तणाव आणि मानसिक असंतुलनाला बरं करतात. याशिवाय ही पानं तणावामुळे मेंदूवर होणाऱ्या नकारात्मक विचारांशी लढा देण्यासही सहाय्य करतात.

कॅन्सरपासून बचाव (Prevents Cancer)

काही संशोधनात तुळशीचं बी हे कॅन्सरवर ईलाजासाठी उपयुक्त असल्याच आढळलंय. खरंतर तुळस अँटीऑक्सीडंट क्रियेला चालना देते आणि कॅन्सरच्या ट्यूमर पसरण्यापासून रोखते. असं म्हणतात की, नियमितपणे तुळशीचं सेवन करणाऱ्यांना कॅन्सर होण्याची शक्यता खूप कमी असते.

पोटासंबंधित आजार

पोटाच्या विकारांमुळे पीडित लोकांसाठी तुळस हे एक वरदान आहे. हो, पोटात जळजळ, पोटदुखी, गॅस, ब्लोटींग इत्यादी समस्या दूर करण्यासाठी तुळशीचा वापर केला जातो. तज्ज्ञांनुसार तुळशीची पान आणि बिया दोन्हीही पोटाचा अल्सरवर गुणकारी आहेत.

किडनी स्टोनवरही लाभदायक (Good For Kidney Stones)

तुळस ही किडनीचं प्रक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करते. याच्या सेवनाने मूत्रविसर्जन सुलभ होते आणि किडनी स्वच्छ राहण्यास मदत होते. जर किडनी स्टोन असेल तर तुळशीचा ताजा रस मधात घालून रोज किमान 4 ते 5 महिने सेवन करावा. यामुळे मूत्रावाटे किडनी स्टोन पडून जाईल.

महत्वाच्या बातम्या –