देशात गेल्या २४ तासात 8954 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; तर ‘इतके’ रुग्ण झाले कोरोनामुक्त

मुंबई – देशात  गेल्या २४ तासात जवळपास 9 हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर देशात गेल्या २४ तासात  कोरोनामुळं 267 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर यात एक चांगली बाब आहे की देशात गेल्या  24 तासांत देशांत 10 हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीमधून मिळाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात  गेल्या 24 तासांत 8954 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे, या काळात 267 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर देशात गेल्या २४ तासात 10207 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.  देशात  गेल्या 24 तासांत 1520 सक्रिय रुग्ण घटले आहेत. त्यानंतर आता देशात एकूण 99023 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं  दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –