Share

जाणून घ्या काय आहेत ग्रीन टी नियमित पिण्याचे फायदे

ग्रीन टी आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. बदलत्या जीवनशैलीमुळे तसेच कामाच्या वाढत्या तणावामुळे गेल्या काही वर्षांपासून ग्रीन टीचे सेवन वाढलेय. योग्य प्रमाणात नियमित ग्रीन टी आरोग्यासाठी हितकारक ठरु शकते. मात्र गरजेपेक्षा जास्त ग्रीन टी शरीराला अपायकारक ठरु शकते. यासाठी अधिक प्रमाणात ग्रीन टीचे सेवन करु नये.

जाणून घ्या काय आहेत ग्रीन टी नियमित पिण्याचे फायदे –

  • वजन कमी करणे – ग्रीन टी शरीरातील पाचन तंत्रास वाढवतो. अतिरिक्त चरबीस शरीरातून बाहेर टाकतो. पोलीफिनोन तत्वामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी बाहेर टाकता येते. त्यामुळे रक्तप्रवाह विकसित होते व वजन कमी करण्यास मदत होते.
  • हृदयासंबंधी आजार – वैज्ञानिकच्या मते ग्रीन टी हि रक्तवाहिनी नलीकांवर मजबुतीचे आवरण चढवते त्यामुळे रक्तातील अतिरिक्त चरबी व साखर शरीराबाहेर टाकल्या जाते. तसेच रक्ताचा प्रवाह हृदयात चांगला ठेवतो.
  • मधुमेह – ग्रीन टी च्या सेवनामुळे रक्तामधील साखर कमी करता येते. त्यामुळे मधुमेहांच्या रुग्णासाठी हि एक वरदान सिद्ध होते. हे इन्सुलिन ला नियंत्रित करतो त्यामुळे मधुमेहात त्रास कमी होतो.
  • एन्टी वायरल आणि एन्टी ब्याक्टेरीयल – ग्रीन टी मध्ये एन्टी वायरल आणि एन्टी ब्याक्टेरीयल तत्व असतात. त्यामुळे इन्फ़्लुएन्जा च्या कर्करोगापासून बचाव होते. अभ्यासातून हे समजले आहे कि ग्रीन टी आपल्या आरोग्यासाठी सर्वोत्तम पेय आहे.
  • भोजन नलीकेचा कर्करोग – ग्रीन टी मुळे भोजन नलीकेच्या कर्करोगाची समस्या दूर होते. यासोबतच आणखी काही हानिकारक कर्करोगांमध्ये डॉक्टर ग्रीन टी चे सेवन करण्याचे सुचवतात याचे नियमित सेवन केल्यास कर्करोग निर्माण करणाऱ्या कोशिकांना नष्ट करता येते.
  • कोलेस्ट्रोल – ग्रीन टी रक्तातील घाण म्हणजेच कोलेस्ट्रोल ची मात्र कमी करण्यास फायदेशीर ठरते.
  • दातांमधील सडने – अभ्यासातून या गोष्टीचा सुगावा लागला आहे. कि ग्रीन टी पिल्याने दातातील हानिकारक ब्याक्टेरीया आणि वायरस कमी होतात त्यामुळे दात सडत नाहीत व दात स्वस्थ ठेवले जातात.
  • रक्तदाब – रोज सकाळी ग्रीन टी चे सेवन रक्तदाब नियंत्रित ठेवतो.
  • मानसिक दडपण – ग्रीन टी च्या सेवनाने आपले मानसिक आरोग्य चांगले होते. मस्तिष्कातील चेतापेशींना अधिक प्रभावी बनविल्यामुळे मानसिक दडपण येत नाही व मनस्थिती उत्तम राहते.
  • त्वचेची रक्षा- ग्रीन टी मुळे त्वचेच्या संबंधी विविध समस्यांवर चांगले उपचार करता येतात. ग्रीन टी च्या सेवनाने त्वचा निरोगी व ताजी तवानी बनते. तसेच उन्हाळ्यात त्वचेच्या सूर्यकिरणामुळे होनाऱ्या त्रासाला कमी करते.

महत्वाच्या बातम्या – 

आरोग्य मुख्य बातम्या विशेष लेख

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon