केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे तरी सुद्धा आठवडाभर अगोदर खाद्यतेलाच्या आयात शुल्कात १० टक्के घट होणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्यानंतर सोयाबीनच्या भावात १०० रुपयांपेक्षा अधिक घट झाल्याचे दिसून आले. केंद्रीय अर्थसंकल्पात नेमके काय होणार, धोरणे सरकार कशी घेणार, याबाबतीत अतिशय गुप्तता पाळली जाते.
नव्या वर्षाच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किंमतीत मोठे बदल
देशभर ही अफवा पसरल्याने सोयाबीनच्या भावात १०० रुपयांनी घट झाली. लातूर बाजारपेठेतही याचे पडसाद उमटले.या वर्षी सोयाबीनच्या उत्पादनात घट झालेली असल्याने सोयाबीनचे भाव ४५०० रुपये क्विंटलपर्यंत पोहोचण्याचा अंदाज होता. महिनाभरापूवी ४४५० रुपये क्विंटलपर्यंत भाव गेला होता मात्र विविध कारणांनी या भावात घसरण होणे सुरू झाले असून चक्क आयात शुल्कात घट होण्याची अफवा पसरल्याने भाव घसरले आहेत.
वांग्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी अस्वस्थ
कदाचित अर्थसंकल्पात काय भूमिका घेतली जाते यावरूनच सोयाबीनच्या भावासंबंधी बाजारपेठेत भूमिका ठरेल. तोपर्यंत भाव पडलेले राहणार असल्याची शक्यता वाढली आहे.शासनाच्या या भूमिकेचा शेतकऱ्याला लाभ झाला. शासनाच्या भूमिकेत बदल झाला तर पुन्हा शेतकरी अडचणीत येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सीताफळपासून बनवा विविध प्रक्रियायुक्त पदार्थ
https://t.co/b2ThJqvAws— KrushiNama (@krushinama) January 24, 2020