खानदेशात कांदा आवक मागील आठ ते १० दिवसांपासून स्थिर

खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक मागील आठ ते १० दिवसांपासून स्थिर आहे. आवक मागील वर्षाच्या तुलनेत कमी आहे. दरात मात्र चढउतार सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

खानदेशात पारा १४ अंशांवर

जळगाव, धुळे, चाळीसगाव, साक्री , अडावद , किनगाव येथील बाजारात कांद्याची आवक स्थिर आहे. या बाजारांमध्ये मिळून रोज सरासरी पाच हजार क्विंटल कांद्याची आवक मागील आठवडाभरात झाली आहे. सर्वाधिक आवक साक्री, जळगाव, अडावद, धुळे येथील बाजारात होत आहे. तर किनगाव, चाळीसगाव बाजारातील आवक कमी झाली आहे. त्यात पांढऱ्या कांद्याचीदेखील आवक होत होती. यंदा पाढऱ्या कांद्याची आवक नगण्य अशीच आहे.

राज्यात काँग्रेसच्या वाट्याला 106 तर राष्ट्रवादीकडे 95 जागा

लाल कांद्याला जळगावच्या बाजारात मागील १० ते १२ दिवसांपासून प्रतिक्विंटल १८०० ते ३५०० रुपये दर मिळत आहे. नोव्हेंबरमध्ये दर नऊ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले होते. दर हवे तसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. परंतु कांद्याची १० ते १५ दिवसांपेक्षा अधिक वेळ साठवणूक करता येत नसल्याने त्याची विक्री शेतकरी बाजारात करीत आहेत.