घोडेगाव बाजार समितीमध्ये सोमवार, बुधवार, गुरुवारीया दिवसामध्ये कांद्याचे लिलाव होत असतात. गेल्या महिनाभरापासून बाजारात कांद्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे राज्यभरात कांद्याचे भाव तेजीत आहेत. बहुतांशी बाजार समितीत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे.
जिल्ह्यातील घोडेगाव तालुका नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता.४) कांद्याला तब्बल १६ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. आत्तापर्यंतचा हा सर्वात उच्चांकी दर असल्याचे सांगण्यात आले. बुधवारी सकाळी ११ वाजता बाजार समितीत लिलाव सुरू होताच जुन्या गावरान कांद्याला १६ हजार ५०० रुपये क्विंटल असा दर मिळाला.
दोन दिवसांपूर्वी याच बाजार समितीमध्ये कांद्याला १३ हजार ५०० रुपये क्विंटल दर मिळाला होता. या दिवशी बाजार समितीतील आवक झालेल्या दहा हजार गोण्यापैकी तीनशे पंचवीस गोण्यांना १६ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला असल्याचे बाजार समितीचे सचिव देवदत्त पालवे यांनी सांगितले.
दर कांदा लिलावाला साधारण तीस हजार गोण्यांची आवक होत असते, मात्र गेल्या महिनाभरापासून आवकही कमालीची घटली आहे. गेल्या आठ दिवसांपासून कांद्याचे दर उच्चांकी होत आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक आहेत त्या शेतकऱ्यांनी मात्र समाधान व्यक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या –
शेतकऱ्यांना ठोस मदतीसाठी निश्चयाने निर्णय घेणार- उद्धव ठाकरे
हिवाळ्यामध्ये कसा असावा आहार, घ्या जाणून……
जाणून घ्या, काय आहेत दुधासोबत खारीक भिजवून खाण्याचे फायदे……
शेतकऱ्यांना कर्ज माफीचा लाभ न मिळाल्याने शेतकरी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयात