कांदा दरात घसरण सुरूच

नाशिकमधील लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढल्याने कांदा दरात घसरण सुरूच आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पाश्ववभूमीवर सरकारवर कांदा भावाचा परिणाम नको म्हणून केंद सरकार सावध भुमिका घेत असल्याचे सध्या स्तिथीत बोलले जात आहे. काल मणजेच ५ फेब्रुवारी २०२० ला कांद्याला १९०० रूपये भाव मिळाला. ५ फेब्रुवारी २०२० च्या तुलनेत ४ फेब्रुवारी २०२०ला कमीत कमी व सरासरी भावात २०० रूपयांची घसरण पाहायला मिळाली.

डाळिंबाचे बाजारभाव कोसळले

४ फेब्रुवारी २०२०ला दुपारपर्यंत १०१८ वाहनातील १४०२० क्विंटल कांदा किमान ७०० ते कमाल १९०५ व सरासरी १६०० रूपये भावाने विक्री झाला होता. लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समितीत ४ फेब्रुवारी २०२०ला  २०१८ वाहनातील लाल कांदा किमान ९०० ते कमाल २१५२ व सरासरी १८०० रूपये भावाने विक्री झाला होता. बाजार समितीच्या लासलगाव मुख्य, निफाड व विंचुर उपबाजारात दररोज २० ते २५ हजार क्विंटल अर्ली खरीप कांद्याची विक्री होत आहे.