निफाडमधील लासलगाव बाजार समितीत द्राक्षमणी खरेदी-विक्रीला सुरवात

नाशिकच्या निफाड तालुक्यात द्राक्षे काढणी हंगामाला सुरवात झाली आहे. द्राक्षला रास्त बाजारभाव मिळण्यासाठी उत्पादकांनी द्राक्षेमणी शेतावर विक्र न करता बाजार समितीच्या अधिकृत खरेदी-विक्री केंद्रावरच विक्रीसाठी आणावे असे आवाहन लासलगांव बाजार समितीचे सदस्य मोतीराम मोगल यांनी उगांव येथील द्राक्षेमणी लिलाव शुभारंभाच्या वेळी केले. मोगल यांच्या  हस्ते द्राक्षेमणी क्रेटस्चे विधीवत पूजा करण्यात आली. पतंगराव ढोमसे यांचा द्राक्षेमणी २२ रूपये प्रती किलो या दराने विक्री झाला.

जाणून घ्या मखाना खाण्याचे फायदे

यावेळी मोगल यांनी सांगितले की, उगांव व परिसरातील द्राक्षे उत्पादकांच्या मागणीनुसार बाजार समितीने उगांव येथे द्राक्षे हंगामात द्राक्षेमणी लिलावास सुरूवात केली होती. गेल्या १४-१५ वर्षात या केंद्रास शेतकरी, अडते, व्यापारी व कामगारांकडुन उत्तम प्रतिसाद मिळाला असुन बाजार समितीच्या सदर उपक्र मामुळे शेतक-यांच्या पैशास सुरक्षिततेची हमी मिळाली आहे.

नाफेडचा तूर खरेदीस नकार; शेतकऱ्यांना दीड कोटीचा फटका बसणार

शिवाय सुरूवातीस काही रक्कम देऊन नंतर पैसे बुडविण्याचे प्रकार होत असे. सदर प्रकारांना आळा घालण्यासाठी बाजार समितीने शेतकरी हित विचारात घेऊन दरवर्षी द्राक्षे हंगामात उगांव, नैताळे, विंचुर, लासलगांव व खानगांव नजिक येथे द्राक्षमणी लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उगांव येथे दरवर्षी द्राक्षेमण्यांच्या खरेदी-विक्रीतून अडीच ते तीन कोटी रूपयांची उलाढाल होते. द्राक्षेमणी खरेदीसाठी अनेक व्यापारी उपस्थित असल्याने उघड व स्पर्धात्मक लिलावाद्वारे द्राक्षेमण्यांना जास्तीत जास्त बाजारभाव मिळतात असे देखील मोगल यावेळी म्हणाले.