नवी दिल्ली – गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत होते. अखेर त्या आंदोलनाला मोठे यश आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेतले आहेत. हे तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकर्यांच्या मागण्यांपुढे दीड वर्षानंतर का होईना अखेर केंद्र सरकारला झुकावे लागले. गेल्या एक वर्षापासून राजधानीच्या सीमेवर पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकरी आंदोलन करत आहेत. दरम्यान शेतकरी आंदोलनाबाबत आज संयुक्त किसान मोर्चाने (SKM) महत्वाची बैठक बोलावली होती.
तीनही कृषी कायदे मागे घेतल्यानंतर आता शेतकऱ्यांनी आपापल्या घरी जावे, अशी विनंती केंद्र सरकारने शेतकऱ्यांना केली होती. मात्र हे आंदोलन अजून संपले नसल्याचे शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी स्पष्ट केले होते. मात्र आता युनायटेड किसान मोर्चाचे नेते गुरनाम सिंह चधुनी (Gurnam Singh Chaduni) यांनी आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली आहे.
युनायटेड किसान मोर्चाने हे आंदोलन स्थगित जरी केले असले तरी त्यांनी सरकारसमोर आपल्या मागण्या मांडल्या आहेत. त्याच सोबत सरकारसमोर मोठी अट देखील घातली आहे. युनायटेड किसान मोर्चाचे नेते गुरनाम सिंह चधुनी ( Gurnam Singh Chaduni) म्हणाले, आम्ही आंदोलन स्थगित करत आहोत, मात्र ते संपवत नाही. सरकार जेव्हा सर्व गोष्टी मान्य करेल, तेव्हाच आम्ही धरणे संपवू. यासोबतच सर्व आंदोलक शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणीही चदुनी यांनी सरकारकडे केली आहे.
- रोज मनुक्याचे पाणी पिल्याने होतील ‘या’ समस्या दूर
- आज दुपारी राज्य मंत्रीमंडळाची बैठक होणार
- राज्यात ५०५१ कोटींचे गुंतवणूक करार; ९ हजार जणांना नोकरीची नवी संधी – सुभाष देसाई
- राज्यातील गोरगरीबांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करणारे ‘ग्रामविकास’चे महाआवास अभियान
- ओमिक्रॉनचा कहर! राज्यातील ‘या’ जिल्ह्यात जमावबंदी लागू
- लोकांच्या जीवापेक्षा कोणताही उद्योग मोठा नाही – विजय वडेट्टीवार