सातत्याने बदलत्या वातारणामुळे बेदणा काळा पडण्यास प्रारंभ

सततच्या पावसाने यंदाच्या हंगामात निकृष्ट प्रतीची द्राक्षे उत्पादित होऊ लागली आहेत. द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीपासून शेतकऱ्यांना अनेक संकटे आली. त्यातून त्यांनी मार्ग काढत दर्जेदार द्राक्ष तयार केली. मात्र, सातत्याने बदलत्या वातावरणाचा फटका द्राक्षाला बसला आहे.

जनावरांना रोगांपासून दूर ठेवण्यासाठी लसीकरण महत्वाचे

त्यामुळे दरवर्षी जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात बेदाण्याचा सुरू होणारा हंगाम यंदा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाला आहे. बहुसंख्य शेतकऱ्यांनी द्राक्षांपासून बेदाणानिर्मितीचा पर्याय निवडला आहे. जिल्ह्यातील बेदाणानिर्मितीच्या ठिकाणी वातावरण कोरडे असल्याने इथला बेदाणा दर्जेदार तयार होतो. मात्र, सध्या हंगामाच्या सुरुवातीलाच बेदाणा उत्पादकांत धास्ती निर्माण झाली आहे.

‘या’ गोष्टीमुळे होऊ शकतो मायग्रेन

त्यामुळे बेदाण्याची प्रतवारी कमी होऊ लागली असून, बेदाणा काळसर पडू आहे. तयार होणारा बेदाणा काळा पडून निकृष्ट प्रतीचा होणार आहे.परिणामी त्याला बाजारात दर मिळणार नाही. त्यामुळे बागायतदारांच्या चिंतेत भर पडली आहे.