पाठदुखी दूर करण्यासाठी काही खास टिप्स

जास्त वजन उचलू नये – काम करताना काळजी घ्या की तुम्ही जी वस्तू उचलत आहेत त्याचं वजन खूप असता कामा नये. खूप वजन उचलण्याचा प्रयत्न करु नका. अन्यथा पाठिवर ताण येऊ शकतो.

ताठ बसा – काम करताना तुमची बसण्याची सवय हे देखील पाठदुखीचं मुख्य कारण असतं. बसताना आपली पाठ नेहमी सरळ असली पाहिजे. वाकून बसू नये.

शेणखत वापरताना घ्या ही काळजी

व्यायाम करा – अनेकांना एकाच जागी बसून काम करावं लागतं. सततची धावपळ आणि कामाचा स्ट्रेस यामुळे व्यायाम करण्यास माणूस टाळाटाळ करतो. शारीरिक हालचाली कमी होत असल्यामुळे स्नायू आणि हाडं कमजोर होतात. बसून काम करणाऱ्यां व्यक्तींनी मणक्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. पाठदुखीचा त्रास असलेल्यांनी याकडे दुर्लक्ष करु नये. नियमित व्यायाम केला पाहिजे.

जाणून घ्या सब्जा खाण्याचे गुणकारी फायदे

ब्रेक घ्या- काम करत असताना काही वेळेनंतर ब्रेक घेत जा. दोन तासांपेक्षा अधिक काळ एकाच ठिकाणी बसून राहू नये. खुर्चीवरून उठून आजूबाजूला फेरफटका मारला पाहिजे.

गुडघ्यांची हालचाल – एकाच ठिकाणी बसल्यामुळे पायांनाही वेदना होतात. हे टाळण्यासाठी गुडघे आणि पायांची हालचाल करत राहा.