शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड वाटपासाठी विशेष मोहीम

नागपूर : पीककर्ज मिळण्यासाठी लागणारी जी कागदपत्रे लागतात तीच कागदपत्रे किसान क्रेडिट कार्ड मिळविण्यासाठी लागणार आहेत. तसेच या कार्डची वैधता ही पाच वर्षे राहणार आहे. तसेच या कार्डवर १ लाखापर्यंत शून्य व्याजदर असणार तर ३ लाखांपर्यंतच्या रक्कमेवर १ टक्का व्याज आकारण्यात येईल. शेतकऱ्यांना सहज कर्जपुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी ही किसान क्रेडिट कार्ड योजना आहे असे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे म्हणाले.

नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरु झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

तसेच पीककर्ज ज्या शेतकऱ्यांना नाही त्यांच्यासाठी कृषिविषयक सर्व सुविधा उपलब्ध होण्यासाठी बँकेमार्फत किसान क्रेडिट कार्ड देण्यासाठी ८ ते २३ फेब्रुवारी या कालावधीमध्ये विशेष अभियान राबविण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.

आधार कार्ड आणि पॅन कार्ड जोडणीसाठी शेवटचे चार दिवस

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांची माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे. पण त्यात ४७४ शेतकऱ्यांचे आधार बॅंक खात्याशी लिंक नसल्याचे निदर्शनास आले.

जिल्ह्यामध्ये १ लाख ५५ हजार ८५० शेतकरी पी. एम. किसान योजनेअंतर्गत लाभार्थी आहे. तसेच कोणत्याही बॅंकेकडून पीककर्ज न घेतलेले शेतकरी जिल्ह्यामध्ये खूप प्रमाणात शिल्लक आहेत. या सर्व शेतकऱ्यांना बॅंकिंग क्षेत्राकडून पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी ही मोहीम राबवण्या बद्दल केंद्र शासनाकडून आदेश प्राप्त झाले आहेत.

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागे मानसिक नैराश्य, 24.7 टक्के शेतकरी नैराश्यग्रस्त

त्याचप्रमाणे संपूर्ण अर्ज आवश्‍यक कागदपत्रांसह प्राप्त झालेल्यापासून १५ दिवसांमध्ये शेतकऱ्यांना बॅंकामार्फत किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) योजनेअंतर्गत पीककर्ज उपलब्ध करून देण्यात येईल.

महत्वाच्या बातम्या –

आठवड्यातील तीन दिवस कृषी सहायकांनी कार्यालयात न बसता गावात जायलाच हवे : कृषिमंत्री

‘ऊसतोड कामगारांसाठी फिरते स्वच्छतागृह आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्या’

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कमी दराचा फटका सोसावा लागणार