Share

साखर कारखान्यांनी इथेनॉल, सीएनजी, सीबीजी आणि ग्रीन हायड्रोजनसारख्या उत्पादनाकडे वळावे – शरद पवार

नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी(१६ नोव्हें.)राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात बोलत असतांना देशातील साखर कारखान्यांनी अतिरिक्त साखरेच्या समस्येवर मात करण्यासाठी इथेनॉल, सीएनजी, सीबीजी आणि ग्रीन हायड्रोजनसारख्या अन्य उत्पादनांच्या पर्यायांकडे वळले पाहिजे, तसेच कारखान्यांचे आधुनिकीकरण केले पाहिजे, अशी सूचना केली.

यावेळी बोलत असतांना ते म्हणाले की,’देशात विक्रमी ऊस उत्पादन झाले असून उसाखालील क्षेत्र ५५ लाख हेक्टपर्यंत वाढले आहे. प्रति हेक्टर उत्पादन ८५ टनांपर्यंत गेले असून साखरेचा उतारा सरासरी ११ टक्कय़ांवर पोहोचला आहे. त्यामुळे साखरेचे उत्पादन ३०० लाख टनांवर पोहोचले असून देशांतर्गत मागणी २६०-२७२ लाख टन आहे. त्यामुळे अतिरिक्त साखरेच्या समस्येवर उपाय शोधण्याची गरज आहे, त्यासाठी साखरेतर उत्पादनांच्या निर्मितीवर साखर कारखान्यांनी लक्ष केंद्रित करावे.’

दरम्यान, यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे आदी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –  

मुख्य बातम्या

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon