मुंबई – राज्यात २०२१-२२ मध्ये ११ डिसेंबर २०२१ पर्यंत तब्बल १८४ साखर कारखाने (Sugar factory) सुरु झाले आहे. राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे. तर ९१ खासगी व ९३ सहकारी तसेच साखर कारखान्यांचा (Sugar factory)समावेश आहे. तर राज्यातील सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने सुरु झाले आहे. तर राज्यातील सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत ४३ साखर कारखाने सुरु झाले आहे. आतापर्यंत जवळपास 312.68 लाख टन उसाचे गाळप करण्यात आले आहे.
राज्यात ११ डिसेंबर २०२१ पर्यंत तब्बल 292.12 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar production) झाले आहे. अशी माहिती आयुक्तालयाकडून मिळाली आहे, तर यामुळे राज्यातील साखर उताऱ्यात चांगली वाढ झाली असून आता राज्याचा सरासरी साखर उतारा 9.34 टक्के इतका आहे.
तर राज्यातील पुणे जिल्ह्यामध्ये तब्बल 65.11 लाख टन उसाचे गाळप झाले आहे. तर पुणे जिल्ह्यामध्ये 62.75 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar production) करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील साखर उतारा 9.64टक्के आहे.
महत्वाच्या बातम्या –
- आंतरराष्ट्रीय चहा दिवस : जाणून घ्या चहा पिण्याचे ‘हे’ फायदे
- वसतिगृह प्रवेश, स्वाधार व परदेश शिष्यवृत्ती प्रक्रिया आता संगणकीकृत ऑनलाईन पद्धतीने राबविणार – धनंजय मुंडे
- जलजीवन मिशन योजनेंतर्गत राज्यातील तब्बल 60 ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना मंजुरी
- मिरची खाणाऱ्यांना नसतो हृदयविकाराचा धोका ! जाणून घ्या
- ‘हे’ उपाय केल्याने घरात एकही पाल दिसणार नाही, जाणून घ्या