अनेकांच्या घरात पाल येण्याची मोठी समस्या असते. सध्या उन्हाळ्याच्या दिवसांत तर हे प्रमाण अधिक वाढलेलं पाहायला मिळातं. खिडक्या, दरवाज्यातून पाली घरांत येत असतात. पाल स्वयंपाकघरात असेल तर ती खाण्या-पिण्याच्या पदार्थांमध्ये पडण्याचाही धोका असतो. परंतु काही घरगुती उपायांनी पाल घालवण्यास मदत होऊ शकते. पाल दिसल्यास तिच्यावर बर्फाचं पाणी स्प्रे करा. ज्या ज्या वेळी पाल दिसेल त्या त्या वेळी हा उपाय करा. यामुळे पाल घरातून निघून जाते.चला तर जाणून घेऊ उपाय….
- काळी मिरी पावडर पाण्यात मिसळून एका बाटलीत भरा. त्यानंतर हे पाणी घरातील प्रत्येक कोपऱ्यात शिंपडा त्यामुळे पाल घरात येण्यास प्रतिबंध लागतो.
- कॉफीमध्ये तंबाखू मिसळून त्याचे गोळे तयार करा. ज्या ठिकाणांहून पाल येते त्या ठिकाणी हे गोळे ठेवल्यानेही पाल घरात येत नाही.
- कांद्याचा रस आणि काही लसनाच्या पाकळ्यांचा रस एकत्र करा. त्यात थोडं पाणी मिसळावं. हे मिश्रण एका बाटलीमध्ये भरा. ज्या ठिकाणी पाल येते त्याठिकाणी हे मिश्रण शिंपडावं. त्यामुळे पाल आपोआप निघून जाईल. लसनाच्या पाकळ्याही पाल येते त्या ठिकाणी ठेवल्यासह फायदा होतो. कांदा लांब-लांब कापून त्याला धाग्यात बांधून घरातील कोपऱ्यात लटकवल्यानेही पाल घरात येत नाही.
- पाल येण्याच्या ठिकाणी अंड्याचं कवच ठेवल्यानेही पाल घरात येत नाही. खिडक्यांच्या कोपऱ्यात कवच ठेवल्याने पालींना आत येण्यास अटकाव होतो. अंड्याचं कवच दर चार दिवसांनी बदलत राहावे.
महत्वाच्या बातम्या –