हळद लागवड तंत्रज्ञान

आयुर्वेदातील हळद हे एक महत्त्वाचे पीक आहे. हळदीला आर्थिक, धार्मिक, औषधी व सामाजिकदृष्टया अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. जगाच्या ८० टक्के हळदीचे उत्पादन हे भारतामध्ये घेतले जाते. हळदीचा उपयोग रोजच्या आहारात, औषधांमध्ये, सौंदर्य प्रसाधनांमध्ये, जैविक कीटकनाशकांमध्ये मोठया प्रमाणावर केला जातो. सामाजिक कार्यातही हळदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हळदीच्या लागवडीमध्ये सर्वात क्लिष्ट बाब म्हणजे हळदीची काढणी व प्रक्रिया … Read more

जांभूळ खाल्याने होणारे फायदे ….

उन्हाळ्याच्या शेवटी व पावसाळ्याच्या सुरुवातीस काळसर जांभळ्या रंगाच्या जांभळाचे घड झाडाला लगडलेले दिसतात. निसर्गाने निर्माण केलेले हे फळ शरीरामध्ये अमृतासमान कार्य करते. जांभूळ हे पाचक आहे. तसेच ते अतिसार थांबविणारे औषध आहे. जांभळीच्या पानांचा रस आणि सालीपासून केलेला काढा घेतल्यानेही अतिसाराला प्रतिबंध होतो. ग्रीष्म ऋतूत आंबा हे अमृतफळ असते तर वर्षांऋतूत जांभूळ हे अमृतफळ असते. … Read more

करवंदाचे औषधी गुणधर्म

‘डोंगरची काळी मैना’ म्हणून प्रचलित असलेले फळ म्हणजे करवंद. हे  छोट्या आकाराचे फळ आरोग्याच्या दृष्टीने फार उपयुक्त आहे.  सहसा जंगलामध्ये, डोंगरकडय़ांवर याची झाडे असतात. हे करवंद हिंदीमध्ये ‘खट्टा मीठा’ या नावाने प्रसिद्ध आहे, तर शास्त्रीय भाषेत उवाऊर्सी या नावाने ओळखले जाते. करवंद ही वनस्पती अपोसायनेसी या कुळातील आहे. करवंदामध्ये नैसर्गिकररीत्या कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असल्याने हाडांच्या … Read more