समाजातील हजारो अनाथांच्या डोक्यावर मायेची पखरण करणारं मातृछत्र हरपलं – अजित पवार

मुंबई – ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनामुळे समाजातील अनाथांच्या डोक्यावर मायेचे मातृछत्र धरणारी माय हरपली आहे. समाजातील हजारो अनाथ मुला-मुलींचा सांभाळ करुन त्यांच्यावर मायेची पखरण करणाऱ्या सिंधुताईंच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)  आपल्या … Read more

अनाथांची माय हरपली! सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यात निधन

पुणे : अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkaal)  यांचे पुण्यात ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ७३ वर्षांच्या होत्या. रात्री ८ वाजून १० मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले. महिनाभरापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. सकाळी ८ त्यांचे पार्थिव मांजरी येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. १२ वाजता पुण्यात … Read more