समाजातील हजारो अनाथांच्या डोक्यावर मायेची पखरण करणारं मातृछत्र हरपलं – अजित पवार

मुंबई – ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनामुळे समाजातील अनाथांच्या डोक्यावर मायेचे मातृछत्र धरणारी माय हरपली आहे. समाजातील हजारो अनाथ मुला-मुलींचा सांभाळ करुन त्यांच्यावर मायेची पखरण करणाऱ्या सिंधुताईंच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)  आपल्या … Read more

समर्थ आणि सशक्त समाज घडविण्यात अंगणवाडी सेविकांचे महत्त्वाचे योगदान – अजित पवार

पुणे – ग्रामीण भागातील लहान मुलांचे भोजन, शिक्षण, आरोग्याची काळजी घेत त्याच्यावर चांगले संस्कार करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि पर्यवेक्षिकांचे समर्थ आणि सशक्त समाज घडविण्यात महत्त्वाचे योगदान आहे. त्यांना मिळालेला पुरस्कार हा ग्रामविकासचा कणा असलेल्या स्त्रीशक्तीचा सत्कार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. जिल्हा परिषदेच्या शरदचंद्र पवार सभागृहात महिला व बालकल्याण विभागातर्फे आयोजित … Read more

सर्व समाजघटकांच्या प्रगतीसाठी दर्जेदार विकासकामे करा – अजित पवार

अहमदनगरसर्व समाजघटकांचा विचार करत शासन काम करत आहे. शेतकरी हिताचे अनेक निर्णय राज्याने घेतले आहेत. कोरोना व इतर अनेक नैसर्गिक संकटातही राज्यातील सर्व जिल्ह्यांना शासनाने जिल्हा नियोजनात शंभर टक्के निधी उपलब्ध करून दिला आहे. निधीचा योग्य विनियोग करून दर्जेदार विकासकामे करावीत असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिले. जामखेड शहर … Read more

समाज कल्याण बोर्ड अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार – यशोमती ठाकूर

मुंबई – समाज कल्याण बोर्ड अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन संदर्भातील प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येतील, असे महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले. समाज कल्याण बोर्ड अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन संदर्भात महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. महिला व बाल विकास मंत्री ॲड. ठाकूर यांनी बोर्डाच्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन मागण्या संदर्भात उच्चस्तरीय समितीकडे … Read more