कृषी उत्पन्न बाजार समितीत काल म्हणजेच २८ जानेवारी रोजी आल्याची २१ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २६०० ते ५००० रुपये दर मिळाला. आवक स्थिर असून, दरही टिकून आहेत.बाजारात हिरव्या मिरचीची ३१ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाला. बिटला प्रतिक्विंटल १५०० ते २२०० रुपये दर मिळाला. लिंबांची पाच क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ७०० ते १२०० रुपये दर होता.
भरताच्या वांग्यांची ३१ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपयांपर्यंत मिळाले. शेवग्याची दीड क्विंटल आवक झाली. शेवगा शेंगांना प्रतिक्विंटल १९०० ते २५०० रुपये दर मिळाला.गवारीची अडीच क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १८०० ते ४२०० रुपये मिळाला. बटाट्याची २५० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १३०० ते १८०० रुपये दर होता. डाळिंबांची २० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २६०० ते ५४०० रुपये दर मिळाला.
कृषी उत्पन्न बाजार समितीत गवार २००० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल
बिटची सहा क्विंटल आवक झाली. पालकाची दोन क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १२०० रुपये मिळाला. गाजराची आठ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल १००० ते १८००० रुपये दर मिळाला.कोबीची २० क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल ११०० ते २००० रुपये मिळाला. काटेरी, लहान वांग्यांची २५ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटल ७०० ते १३०० रुपये दर मिळाला. कोथिंबिरीची नऊ क्विंटल आवक झाली. ५०० ते ११०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. मेथीची आठ क्विंटल आवक झाली. मेथीस प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपये दर होता. भेंडीची १६ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपये मिळाला. टोमॅटोची १५ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल १३०० ते १९०० रुपये मिळाला.
नवी मुंबईच्या कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची तारीख जाहीर, उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात https://t.co/fRcjCzor8F
— KrushiNama (@krushinama) January 29, 2020