अळूची पाने खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. अळू ही कंदमूळ प्रकारात मोडणारी, अरॅशिए सुरण कुळातील वनस्पती आहे. मुळात आग्नेय आशियातली ही वनस्पती आता आफ्रिका व आशिया खंडांतील उष्ण कटिबंधीय प्रदेशांमध्ये सर्वत्र आढळते. अळू बारमाही उगवणारा असून, याची पाने व कंद खाण्याजोगे मानले जातात. अळू ही एक औषधी वनस्पती मानली जाते. चला तर मग जाणून घ्या काय आहेत याचे फायदे.
जाणून घ्या काजू खाण्याचे हे फायदे
- अळूची पाने वजन कमी करण्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. या पानांमध्ये असणारे फायबर पचनक्रिया सुधारते. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
- शक्तपणा दूर करण्यासाठी अळूची पाने ही प्रभावकारी ठरतात.
- अळूची पाने शरिरात रक्त वाढवण्यास मदत करतात.
- तुम्हाला पोटांच्या कोणत्याही समस्या त्रास देत असतील, तर अळूच्या पानांचे सेवन तुमच्या त्रासावर फायदेशीर ठरू शकतात. त्यामुळे पचनक्रियाही सुरळीत होण्यास मदत होते.
- अळू थंड असल्याने ते वात, पित्त, कफ नाशक असतात.
- तुम्हाला जर सांधेदुखीचा जास्त त्रास असेल, तर दररोज अळूच्या पानांचे सेवन करणे तुमच्या त्रासासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे तुम्हाला सांधेदुखीवर आराम मिळेल.
महत्वाच्या बातम्या –