काजूला ड्रायफ्रुट्सचा राजा मानले जाते. शरीरासाठी काजू खूप गुणकारी आहेत. काजूचे निअयमित सेवन केल्यास विविध फायदे दिसून येतील. थोडेसे काजू खाल्ल्याने शरीराला केवळ उर्जाच मिळत नाही तर विविध आजार आपल्यापासून दूर राहतात. काजूमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन बी, सी मोठ्या प्रमाणात असते, तसेच काजूत पोटॅशिअम, मॅग्नेशिअमचं प्रमाण देखील सर्वाधिक असते. चला तर जाणुन घेउयात काजू खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे.
लिंबू पाणी पिण्याचे जाणून घ्या ‘हे’ फायदे
- काजू खाल्ल्याने लहान मुलांमध्ये मेंदूची चांगली वाढ होते. त्यांनी काजू आवर्जून खायला द्यावेत.
- काजुमध्ये शुगरचं प्रमाण फार कमी असतं आणि यात खराब कोलेस्ट्रॉलही नसतात. ज्यामुळे काजू डायबिटीजच्या रुग्णांसाठी अधिक फायदेशीर ठरतात. पण त्यांनी काजू कमी प्रमाणात सेवन करावे.
- काजूमध्ये असलेले अँटीऑक्सिीडंट्स मुळे डोळ्याच आरोग्य चांगली ठेवण्यास मदत करते.
- अशक्तपणा किंवा थकवा जाणवल्यास दररोज काजू खावेत.
- काजू खाल्याने स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. तसेच काजूत असणाऱ्या एनर्जीमुळे मायग्रेन, डोकेदुखीचा त्रास होत असल्यास तो १०० टक्के कमी होतो आणि कालांतराने कमी होतो.
- काजुमध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असते. काजू खाल्याने केस आणि त्वचा स्वस्थ आणि सुंदर होते. पायांना भेगा पडल्या असतील तर काजूचे तेल लावून पायात मोजे घालावेत, काही दिवसातच भेगा नाहीशा होतात
महत्वाच्या बातम्या –
जाणून घ्या भुईमुगाच्या शेंगा खाण्याचे फायदे
राज्य वन्य जीव मंडळाची पुनर्रचना करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता