बडीशेप खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे

भारतीय अन्नपदार्थांमध्ये बडीशेपला महत्त्व आहे. मुखशुद्धी म्हणून बडीशेप खाल्ली जाते. पण केवळ तेवढाच त्याचा उपयोग नाही. बडीशेपमध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, खनिज, व्हिटॅमिन सोबतच पोषक तत्व असतात. ज्यामुळे आरोग्याला फायदा होतो. बडीशेप अपचन दूर करते, पोटदुखी आणि श्वासासंबंधी आजारात औषध म्हणून वापरली जाते. जेवणानंतर किंवा हॉटेलमध्ये खाल्ल्यानंतर आपण बडीशेप आवर्जुन खातो. अनेक पदार्थांमध्ये बडीशेपचा वापर केला जातो. दररोज बडीशेप खाल्ल्यानं काय फायदे होतात जाणून घेऊयात.

७ ते १३ ऑगस्ट दरम्यान ‘या’ जिल्ह्यात राहणार संचारबंदी

  • बडीशेप हा अॅसिडीटीवरील रामबाण उपाय आहे. याचा वापर अनेक अॅसिडीटीवर आराम देणाऱ्या औषधांमध्ये केला जातो.
  • रात्री झोपण्यापूर्वी बडीशेप आणि साखर बारीक करून कोमट पाण्यासोबत घ्यावी. त्यामुळे बद्धकोष्ट आणि गॅसच्या त्रासापासून आराम मिळतो.
  • पोटात दुखत असेल तर भाजलेली बडीशेप खावी. उन्हामुळे जळजळ होत असेल तर सरबत किंवा बडीशेप भिजवलेलं पाणी प्यावं.

राज्यात तीन लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त – राजेश टोपे

  • तोंडाला दुर्गंधी येत असेल तर कायम जवळ बडीशेप ठेवावी. बडीशेप तोंडाची दुर्गंधी घालवण्यात मदत करते.
  • जर तुम्हाला अपचनाची समस्या असेल तर तुम्ही बडीशेप पाण्यात उकळून खडीसाखरेबरोबर दिवसातून दोन-तीन वेळा खावी. यामुळे अपचन आणि आंबट ढेकरा येणं लगचे बंद होईल.
  • बडीशेप खाल्ल्याने ब्लड प्रेशरही कंट्रोलमध्ये राहतं. बडीशेपमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशिअम असतं, जे शरीरासाठी आवश्यक असतं. हे रक्तवाहिन्यांना लवचिक बनवतं. ज्यामुळे तुमचं ब्लड प्रेशर नियमित राहतं.

महत्वाच्या बातम्या –

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात झाला दमदार पाऊस 

‘या’ जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात