अक्रोड खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, तुम्हाला माहिती आहे का?

अक्रोड हा सुकामेव्यातील एक प्रमुख प्रकार आहे. इंग्रजीमध्ये अक्रोडाला Walnut असं म्हणतात. सामान्यतः अक्रोड सुकामेव्यात मिसळून खाल्ले जातात. मात्र अक्रोडाचा वापर अनेक पदार्थांमध्ये समावेश केला असतो. अक्रोड केक, चॉकलेट, कुकीज, लाडू, मसाले दूध, आईस्क्रिममध्ये केला जातो. अक्रोडामुळे मेंदूचे कार्य सुरळीत होते. याशिवाय अक्रोडामध्ये अनेक आरोग्यदायी फायदे दडलेले आहेत. याशिवाय अक्रोडाचे तेलदेखील त्वचा आणि केसांचे सौदर्य वाढविण्यासाठी वापरले जाते. तसंच अक्रोडाच्या कच्चा फळापासून मुंरबा, चटणी, सरबत तयार केले जाते. चला तर जाणून घेऊ फायदे….

बडीशेप खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे

  • रोज अक्रोड खाल्याने शरीरावर होणाऱ्या सफेद डागांची समस्या दूर होते.
  • अक्रोड रक्तातील कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी ठेवण्याचं काम करतं. तसेच पचनासाठीही मदत करतं. पोटाच्या समस्यांवरही अक्रोड फायदेशीर ठरतं. एका दिवसामध्ये 2 ते 3 अक्रोड खाल्याने वजन कमी होतं.
  • अक्रोडच्या सेवनाने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं आणि शरीराला आवश्यक एनर्जी मिळते.

नारळ पाणी पिण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

  • अक्रोडची पाने चावल्याने आपल्या दातात होणाऱ्या वेदना कमी होतात.
  • अक्रोड लिव्हर संबंधित समस्या, थायरॉइड, सांधे दुखी तसेच पिंपल्स, डायबेटीज यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतं.
  • अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड असतं. त्यामुळे याचं सेवन करणं हदयाचे आरोग्य राखण्यासाठी मदत करतं.

महत्वाच्या बातम्या –

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात झाला दमदार पाऊस 

राज्यात आज ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार