शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी हे तीन कृषी कायदे आणले होते – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेतले आहेत. सकाळी ९ वाजता मोदींनी देशाला संबोधीत करण्यासाठी भाषणाला सुरुवात केली.  शेतकऱ्यांना समजवण्यात आम्ही कमी पडलो असे म्हणत मोदींनी देशाची माफी मागीतली. शेतकऱ्यांनी आपले आंदोलन संपवून घरी परत जावे, असे अवाहनही मोदींनी आपल्या भाषणातून केले.

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, आमचं सरकार सेवा भावनेतून शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी कटिबद्ध आहे. अनेक पिढ्या जे स्वप्न पाहत होत्या ती स्वप्न आम्ही पूर्ण करत आहोत. माझ्या राजकीय जीवनात मी शेतकऱ्यांच्या समस्या अनुभवल्या आहेत.

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी हे तीन कृषी कायदे आणले गेले होते. लहाण शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगली किंमत मिळावी, शेतमाल विक्री करण्यासाठी जास्तीत जास्त पर्याय उपलब्ध व्हावेत हा या कायद्यांमागचा उद्देश होता.

देशानं मला पंतप्रधान म्हणून संधी दिल्यानंतर मी शेती विकासाला प्राधान्य दिले. देशातील शंभरमधील ८० शेतकरी अल्पभूधारक आहेत. त्यांच्याकडे दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे. या शेतकऱ्यांची संख्या १० कोटींपेक्षा अधिक आहे. देशानं मला पंतप्रधान म्हणून संधी दिल्यानंतर मी शेती विकासाला प्राधान्य दिले.

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि देशहितासाठी संपूर्ण सत्यनिष्ठेने आणि शेतकऱ्यांच्या चांगल्यासाठी आम्ही हे कायदे आणले होते. शेतकऱ्यांच्या हिताचे हे कायदे होते. आम्ही काही शेतकऱ्यांना समजावण्यात कमी पडलो. अशी नाराजीही मोदींनी व्यक्त केली आहे.

आम्ही शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवलं. पीक विमा योजना अधिक प्रभावी आणि पारदर्शी बनवली. त्यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी त्यात सहभागी झाले. नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्यासाठी नियम बदलले. त्यामुळे गेल्या चार वर्षात एक लाख कोटींपेक्षा अधिक नुकसान भरपाई आम्ही शेतकऱ्यांना देऊ शकलो.

शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी १ लाख ६२ हजार कोटी रुपये वर्ग केले. शेतमालाला चांगले दर मिळावे यासाठी अनेक पावले उचलली. आम्ही एमएसपीत वाढ केली, खरेदी केंद्रही वाढवले. आम्ही देशभरातील कृषी बाजारांचे आधुनिकीकरण केलं. त्यावर कोट्यावधी रुपये खर्च केले.

दरवर्षी सव्वालाख कोटी रुपये शेती क्षेत्रावर खर्च केले जात आहेत. गाव आणि शेतीच्या जवळपास गोदाम आणि कृषी उपकरणांचा विकास यासाठी वेगानं काम करण्यात येत आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणातून म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –