धन खरेदी केंद्राची तपासणी करण्यासाठी तीन भरारी पथक तयार

गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत जिल्ह्यात एकूण ६६ शासकीय धान खरेदी केंद्रावरुन हमीभावानुसार धान खरेदी करण्यात येत आहे. मात्र अनेक केंद्रावर नियमांचे उल्लघंन आणि भरडाईच्या प्रक्रियेत घोळ होत असल्याची ओरड वाढली होती. शासनाने अधिकाऱ्यांचे तीन भरारी पथक तयार करुन ते गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात पाठविले आहे.

कांदा दरात घसरण सुरूच

या पथकाने बुधवार पासून म्हणजेच ५ फेब्रुवारी २०२० ला केंद्रांना भेटी देऊन तपासणी करायला सुरवात केली आहे. यामुळे फेडरेशनचे अधिकारी आणि राईस मिलर्समध्ये खळबळ उडाल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर सध्या खरीप हंगामातील धान खरेदी सुरू आहे. मात्र यंदा धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने खरेदी केंद्रावर धानाची आवक वाढली आहे. यामुळे या दोन्ही विभागाचे नियोजन फसले आहे. तर काही केंद्रावर खरेदी करण्यासाठी लागू केलेल्या निर्देशांचे सुध्दा उल्लघंन केले जात असल्याचे निदर्शनास आले होते.

गोंदिया जिल्ह्यात भरडाई केलेला तांदूळ ठेवायचा कुठे असा प्रश्न निर्माण

तर काही केंद्रावर शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांकडून धान खरेदी केली जात होती. तर खरेदी केंद्रावर आवश्यक सोयी सुविधांचा अभाव होता. या भरारी पथकाने बुधवार पासून म्हणजेच ५ फेब्रुवारी २०२० ला जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांकडून खरेदी केंद्राची यादी घेऊन केंद्राना प्रत्यक्ष भेट देऊन चौकशीला सुरूवात केली आहे. शासनाने चौकशीसाठी ठरवून दिलेल्या गोष्टींचे बारीक निरीक्षण करायचे असून केंद्रावरील धानाची भरडाई करण्यासाठी करार केलेल्या राईस मिलला भेट देऊन नियमानुसार भरडाई करुन सीएमआर तांदूळ जमा केला जात आहे किंवा नाही याची चाचपणी करायची आहे. यामुळे सध्या जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि राईस मिलर्समध्ये खळबळ उडाली आहे.