राज्यातील नांदेड जिल्ह्यात १३ हजार १३१ हेक्टर क्षेत्रावर हळद लागवड

मुंबई –  जगाच्या ८० टक्के हळदीचे उत्पादन हे भारतामध्ये घेतले जाते. हळदीचा उपयोग रोजच्या आहारात, औषधांमध्ये, सौंदर्य प्रसाधनांमध्ये, जैविक कीटकनाशकांमध्ये मोठया प्रमाणावर केला जातो. सामाजिक कार्यातही हळदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हळदीच्या लागवडीमध्ये सर्वात क्लिष्ट बाब म्हणजे हळदीची काढणी व प्रक्रिया करणे होय. यामुळे हळदीला चांगला भाव असूनही शेतकरी या पिकाची लागवड करण्यात धजावत नाहीत. परंतु सध्या हळद पिकामध्ये झालेल्या यांत्रिकीकरणामुळे हळदीखालील क्षेत्रात महाराष्ट्रात (maharashtra) मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

देशात तब्बल २३ राज्यांमध्ये हळद लागवड (Turmeric cultivation) करण्यात येते. तर यामध्ये यंदा महाराष्ट्रने देशात हळद लागवडीत पहिला क्रंमाक मिळवला आहे. महाराष्ट्रात यंदा तब्बल ८६ हजार हेक्टर क्षेत्रावर हळद लागवड करण्यात आली आहे. तर मागील वर्षी देशात तेलंगणा हळद लागवडीमध्ये पहिल्या क्रंमाकावर होता, मागील वर्षी तेलंगणा राज्यात तब्बल ५६ हजार हेक्टर वर हळद लागवड करण्यात आली होती मात्र यंदा महाराष्ट्र (maharashtra) पहिल्या क्रंमाकावर आहे. महाराष्ट्रातील हिंगोली ,नांदेड (Nanded)  या भागांमध्ये हळद लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात  आली आहे.

तर मागील वर्षी राज्यात  १८ हजार हेक्टरवर हळद लागवड (Turmeric cultivation) करण्यात आली होती. तर यंदा तब्बल ८६ हजार हेक्टर क्षेत्रावर हळद लागवड करण्यात आली आहे. ११ हजार ७५६ हेक्टर इतके अत्यल्प क्षेत्र असल्याने महाराष्ट्र (maharashtra)  हळद उत्पादनात सहाव्या स्थानावर होता. तर आता महाराष्ट्र सहाव्या स्थानावरून थेट पहिल्या स्थानावर आला आहे. महाराष्ट्रातील नांदेड (Nanded) जिल्ह्यात तब्बल १३ हजार १३१ हेक्टर क्षेत्रावर हळद लागवड करण्यात आली आहे. तर राज्यातील हिंगोली जिल्ह्यात तब्बल ४९ हजार ७६४ हेक्टर क्षेत्रावर हळद लागवड करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या –