रोज सकाळी ओव्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

सर्वसाधारणपणे ओव्याचा वापर स्वयंपाकामध्ये एखाद्या पदार्थाचा स्वाद वाढविण्यासाठी केला जातो. घरामध्ये कोणाला अचानक पोटदुखीचा त्रास सुरु झाला, तर थोडासा ओवा गरम करून खावयास देणे, हे तर आजीच्या बटव्यातले पोटदुखीवरचे रामबाण औषध आहे. पण केवळ पोटदुखीवरच नाही, तर सर्दी-पडसे, शरीरामध्ये भरून राहिलेली थंडी, किंवा सतत नाकातून पाणी गळत असल्यासही ओवा घेतल्याने फायदा होतो. चला तर मग जाणून घेऊ फायदे…

  • ओव्याचे पाणी नियमित घेतल्यास पचनक्रिया सुरळीत होते. यामुळे वजन घटवण्यासही मदत होते.
  • निद्रानाश झाल्यास झोपण्याआधी एक कप ओव्याचे पाणी पिऊन झोपा. यामुळे झोप चांगली येते.
  • सर्दी, खोकल्याचा त्रास दूर होतो. तसेच अस्थमासारख्या आजाराचा धोकाही टळतो.
  • दररोज सकाळी ओव्याचे पाणी प्यायल्यास दातांचे दुखणे तसेच तोंडाचा वास दूर होतो.
  •  तुम्हाला डोकेदुखीचा त्रास सतत जाणवत असेल तर ओव्याचे पाणी प्यायल्याने आराम पडतो.

महत्वाच्या बातम्या –