Share

‘ओमायक्रॉन’ संबंधी केंद्र सरकारनेही कडक भूमिका घेतली पाहिजे – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन (Omicron)चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमिक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रातही या विषाणूने शिरकाव केला आहे. राज्यामध्येही या नव्या व्हेरिएंटचे २ रुग्ण आढळले. त्यानंतर आज(६ डिसें.) ओमायक्रॉनचा(Omicron) आठवा रुग्ण राज्यात सापडला आहे. यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात कठोर नियम लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी याविषयी भाष्य केले आहे.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त पवारांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना(Dr.Babasaheb Ambedkar) अभिवादन केले. यानंतर प्रसारमाध्यमांशी ‘ओमायक्रॉन’संबंधी संवाद साधतांना पवार म्हणाले की,’मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रशासनातील सर्वांचं यावर बारकाईनं लक्ष आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये बाहेरचे जे रुग्ण येतात त्यासंबंधी केंद्र सरकारनेही कडक भूमिका घेतली पाहिजे. जिथे जिथे आंतरराष्ट्रीय विमानतळं आहेत तिथे नियमांचे पालन अतिशय काटेकोरपणे होते की नाही हे देखील पाहिले पाहिजे.’

दरम्यान,’यापूर्वीदेखील आपण मार्च महिन्यात अनुभव घेतला होता. एक दांपत्य दुबईवरुन आले, त्यांच्यामुळे चालकाला करोना झाला आणि तेथून फोफावला. आताही देशातील इतर राज्यात एक दोन रुग्ण दिसत होते. पण त्यांच्या फक्त कुटुंब नाही तर नातेवाईकांनाही लागण झाल्याचं दिसत आहे. खूप जण काळजी घ्या, नियमांचं पालन करा, मास्क वापरा, तीव्रता कमी आहे सांगतात. पण त्याबद्दल देश पातळीवरच आरोग्य विभागाने आणि जागतिक आरोग्य संघटनेने एकदा भूमिका स्पष्ट केली पाहिजे,’ असेही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या – 
आरोग्य मुख्य बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon