मधमाश्यांनी चावा घेतल्यावर कोणते उपचार घ्यावेत? जाणून घ्या फक्त एका क्लिकवर..

मधमाशी चावल्यानंतर सौम्य वेदना, खाज येणं, माशी चावल्याच्या जागी पांढरा डाग, त्वचेवर लालसरपणा, सूज अशी लक्षण आढळतात. लहान चिमटा मदतीने त्वचेमध्ये अडकलेला मधमाशीच्या पंखाचा भाग काढा. तो भाग साबणाने स्वच्छ करा. त्यावर बर्फ लावा. बर्फामुळे वेदना आणि सूज कमी होण्यास मदत होते.

मधमाशी चावल्यानंतर सर्वांत आधी चावलेल्या जागेवर क्रेडिट कार्डच्या साहाय्याने दाब तयार करावा. जर त्या जागेवर काटा राहिला असेल तर तो कार्डाच्या मदतीने निघून जाईल. जर काटा तसाच राहिला तर शरीरात विष पसरू लागते. यामुळे व्यक्तीला जास्त वेदना होतात.

अशा स्थितीत व्यक्तीने तातडीने त्या चावलेल्या जागेवर बर्फाच्या तुकड्याने सुमारे १५ ते २० मिनिटे चोळावे. असे केल्याने सूज येणार नाही. बर्फामुळे रक्तप्रवाह मंद होतो आणि सूज येत नाही. त्या जागेवर त्वरित टूथपेस्ट लावावी. टूथपेस्टमध्ये अल्केलाइन असल्यामुळे विषारी दंशाच्या वेदना कमी होण्यास मदत मिळते.

तसेच तसेच टूथपेस्टमध्ये अल्केलाइन असल्यामुळे विषारी दंशाच्या वेदना कमी होण्यास मदत मिळते. पपईसुद्धा खूप फायदेशीर आहे. पपईचा छोटासा तुकडा त्या जागेवर लावावा. पपईत असलेल्या पापेन नावाच्या एंझाइम्समुळे विषारी दंशाचा परिणाम कमी होत जातो. मधामध्ये जिवाणूविरोधी घटक असतात. यामध्ये असलेल्या हायड्रोजन पेरॉक्साइडमुळे रुग्ण लवकर बरा होतो व वेदनाही कमी होतात.

महत्वाच्या बातम्या –