मानवी शरीरात हजारो , लाखो पेशी असतात व त्या व्हिटॅमिन, खनिजे व इतर पोषक तत्त्वांवर अवलंबून असतात. यातूनच आपल्याला दिवसभर काम करण्यास ऊर्जा मिळते. त्यामुळेच मानवी शरीराचे कार्य व्यवस्थितरीत्या चालावे म्हणून संतुलित व पौष्टिक आहाराची गरज असते, यात दुमत असू शकत नाही. तसेच शरीराच्या सक्रियतेवर वाईट परिणाम होतो. व आपल्याला किरकोळ व अतिथकव्याचा त्रास होऊ शकतो. चला तर जाणून घेऊ उपाय…
- दिवसभर ऊर्जा पातळी राखण्यासाठी मोड आलेले मूग आणि हरभर्याचे सेवन करावे. यामुळे थकवा दूर होईल.
- जेवणातून तुमच्या शरीराला ताकद मिळते त्यामुळे व्हिटॉमिन बी, मॅग्नेशियम, पोटेशियम आणि लोहयुक्त जेवण खाणे आवश्यक आहे. फळे आणि भाज्यांचे प्रमाण वाढवा.
- अपूर्ण झोप हे थकवा येण्यामागचं कारण असतं. त्यामुळे भरपूर झोप घ्या. जास्त झोपणे ही टाळा कारण यामुळे माणून आणखी आळशी बनतो.
- दिवसभरात भरपूर पाणी प्यावे. कारण शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे शरीराच्या स्नायूंना जास्त मेहनत करावी लागते. यामुळे व्यक्ती लवकर थकून जातो.
- कामाच्या अधिक व्यापामुळे वेळेवर जेवण होत नाही. त्यामुळे जंक फूडचे सेवन अनेकजण करतात; परंतु जंक फूड खाण्याचे टाळावे.
महत्वाच्या बातम्या –
- तुम्हाला माहित आहेत का विड्याचे पान खायचे फायदे? जाणून घ्या फक्त एका क्लिकवर..
- शेतीला पशू व दुग्ध व्यवसायाची जोड; यातूनच शेतकऱ्यांना अधिकचे उत्पन्न – अशोक चव्हाण
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या जोरदार पावसाची शक्यता
- चांगली बातमी – राज्यात एकाच दिवसात तब्ब्ल ‘इतक्या’ रुग्णांनी केली कोरोनावर मात
- सावधान! राज्यातील ‘या’ पाच जिल्ह्यांना हवामान खात्याने केला रेड अलर्ट जारी