केंद्राच्या मदतीची वाट न पाहता, लागल्यास कर्ज काढू पण शेतकऱ्यांना मदत करणार – अजित पवार

औरंगाबाद – मराठवाड्यातच नाही तर पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आदी ठिकाणी देखील शेतीचे प्रंचड नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची आमची भूमीका आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या एनडीआरएफ फंडातून मदत मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, केंद्राच्या मदतीची वाट न पाहता, लागल्यास कर्ज काढू पण शेतकऱ्यांना मदत करणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयात अजित पवार यांनी मराठवाड्यातील परिस्थितीची आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, रस्ते, पुलांचे आणि तलावांचे नुकसान झालेले आहे. काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकला असल्याने यंत्रणा व्यस्त होती. आता सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. नांदेड जिल्ह्याला बॅक वॉटर पाण्याचा त्रास होतो. त्यामुळे त्या संदर्भात विधानसभा पोटनिवडणूक संपल्यानंतर बैठक घेण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

मराठवाड्यातील सर्वच धरणात पाणी पातळी चांगली आहे, ही समाधानकारक बाब असली तरी शेतकऱ्यांचे खुप नुकसान झाले असल्याचे ते म्हणाले. दुष्काळी परिस्थितीत आपण कर्जाचे पूर्णगठण करतो. त्यामुळे शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळण्यास सलवत मिळते. तसेच काही करता येते का, याची चाचपणी केली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या –