दही आरोग्यासह त्वचेसाठीही फायदेशीर; जाणून घ्या फायदे

मुंबई – दहीचे आपल्या शरीरावर नेहमीच चांगले परिणाम होतात. दही हा बहुतेक लोकांच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. दररोज दही खाल्ल्याने केवळ ताजेतवाने वाटत नाही तर, पाचन तंत्रही ठीक राहते आणि पोटाचा त्रासही होत नाही. दही ऑस्टिओपोरोसिस, रक्तदाब, केस आणि हाडे यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. दह्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, राइबोफ्लेविन, व्हिटामिन बी 6 आणि व्हिटामिन बी12 या पोषक घटकांचे प्रमाण अधिक असते.

  • दररोज दही खाल्ल्याने उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो.
  • दहचे  हे सेवन केल्याने आपल्याला जास्त काळ भूक लागणार नाही, आणि वजन नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त ठरते.
  • केसांवर आणि त्वचेवर दही लावल्याने त्याचे चांगले परिणाम दिसू लागतात.
  • हृदयाशी संबंधित आजारांपासून दूर राहण्यासाठीही दही उपयुक्त आहे.
  • जर आपण दररोज दह्याचे सेवन केले तर शरीराला नुकसान करणारे बॅक्टेरिया नष्ट होतात.
  • डोक्यातील कोंडा टाळण्यासाठी केसांना दही लावणे फायदेशीर ठरते. यासाठी केसांना दही लावून अर्ध्या तासाने केस धुवावे.

महत्वाच्या बातम्या –