देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाल्यानंतर केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार पीएफ खातेधारकांना आता पैसे काढण्यासाठी 3 दिवस प्रतीक्षा करावी लागणार नाही. आता ऑनलाइन अर्ज केल्यानंतर अवघ्या एका तासात तुमच्या खात्यात पीएफचे पैसे जमा होतील. याअंतर्गत एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे.
नोकरी करणारा व्यक्ती म्हणजे पगारदार व्यक्तीअडचणीत असतानाच पीएफचे (PF) पैसे (Money) काढतो . ईपीएफओने (EPFO) पीएफ खात्यातून ऑनलाइन पैसे (Online Money) काढण्याची सुविधा सुरु केल्यानंतर लोकांची मोठी सोय झाली आहे. आयुष्यात असे प्रसंग येतात जेव्हा तुम्हाला अचानक पैशाची गरज भासते. अशा वेळी, पीएफची रक्कम तुमच्यासाठी सर्वात उपयुक्त असते.
अशा प्रकारे तुम्ही पीएफमधून आगाऊ पैसे काढू शकता …
१ ) सर्वप्रथम www.epfindia.gov.in वेबसाइटच्या होम पेजवर जा.(Go to the home page.)
२) आता वरच्या उजव्या कोपर्यात दिलेल्या Online Advance Claim वर क्लिक(click) करा.
३ ) https://unifiedportalmem.epfindia.gov.in/memberinterface वर क्लिक(click) करा
येथे तुम्हाला ऑनलाइन सेवेवर क्लेम फॉर्म दिसेल, येथे तुम्हाला फॉर्म-31,19,10C आणि 10D दिसेल.
४ ) तुमच्या बँक खात्यातील शेवटचे 4 अंक टाकून पडताळणी करा.
यानंतर Proceed for Online Claim वर क्लिक(click) करा.
५ ) ड्रॉप डाउनमधून पीएफ अडव्हान्स निवडा (फॉर्म 31)
आता तुम्हाला ज्या कारणासाठी पैसे हवे असतील, ते कारण निवडा.
६ ) रक्कम प्रविष्ट करा(Enter the amount) आणि चेकची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा.
७ ) नंतर तुमचा पत्ता त्या समाविष्ट करा(Then include your address)
८ ) Get Aadhaar OTP वर क्लिक करा आणि आधार लिंक केलेल्या मोबाईलवर मिळालेला OTP टाका.
९ ) तुमचा दावा दाखल झाला आहे. काही तासांत, तुमचे हक्काचे पैसे बँक खात्यात(Bank account) जमा केले जातील.
महत्वाच्या बातम्या –
- उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडणार? जाणून घ्या
- सर्दी, खोकला, ताप, कप झाला आहे का ?; हे करा जबरदस्त घरगुती उपाय !
- पीएम किसान सम्मान निधीची रक्कम वाढणार? अर्थसंकल्पात नरेंद्र मोदी मो
- नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी; महाराष्ट्रात मध्ये रेल्वेत होणार मोठी भरती, अ
- राज्यातील ‘या’ ६ जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका; पिकांसह पाले