PF खात्यातून 1 तासात पैसे काढू शकता ; ‘हा’ आहे सोपा मार्ग !

देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाल्यानंतर केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार पीएफ खातेधारकांना आता पैसे काढण्यासाठी 3 दिवस प्रतीक्षा करावी लागणार नाही. आता ऑनलाइन अर्ज केल्यानंतर अवघ्या एका तासात तुमच्या खात्यात पीएफचे पैसे जमा होतील. याअंतर्गत एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे. नोकरी करणारा व्यक्ती म्हणजे पगारदार व्यक्तीअडचणीत असतानाच … Read more

शाळा ,कॉलेज सुरु होणार का? याबात आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाची शक्यता

मुंबई –  मागील काही दिवसापासून  कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. यासोबतच ओमायक्रॉनचे (Omicron) देखील रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात कडक निर्बंध लागू केले असून शाळा ,कॉलेजही बंद ठेवण्यात आले आहे. मात्र आता शाळा पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची शक्यता शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली … Read more

मोठा निर्णय : आता सर्व दुकानांवरील पाट्या मराठीत

मुंबई – दुकानांच्या पाट्या मराठीत (Marathi) असण्याबाबत ‘महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम २०१७ हा अधिनियम लागू होत असल्याने दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना व दुकाने नियमातून पळवाट काढत असल्याचे आढळून आले. अशा प्रकारच्या तक्रारी शासनास प्राप्त झाल्या व त्यावर उपाययोजना करण्याची मागणीही होत होती. मंत्रिमंडळाने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना ( नोकरीचे … Read more

मंत्रिमंडळ मोठे निर्णय : दि. १२ जानेवारी २०२२

मुंबई महापालिका क्षेत्रातील पाचशे फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील पाचशे चौरस फूट किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्यास आज मंत्रिमंडळाने (Cabinet) मान्यता दिली. मंत्रिमंडळ (Cabinet) बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  १ जानेवारी, २०२२ रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये मुंबई महापालिकेच्या … Read more

कोरोना संक्रमणामुळे पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचा प्रशासनाचा निर्णय – जयंत पाटील

सांगली – कोरोनाचे (Corona) संक्रमण अतिशय झपाट्याने वाढत आहे. त्याला आपल्याला तोंड द्यावे लागेल, त्याला पर्याय नाही. यासाठी आपण सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय आजच जिल्हा प्रशासनाने घेतलेला आहे. नववी व दहावी मधील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याची मोहिम सुरू आहे. तरीही सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनाचा प्रसार कमी … Read more

स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला निधी मिळण्याबाबत शासन निर्णय जारी

मुंबई – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून मूर्त स्वरूप घेत असलेल्या स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार (Sugarcane workers) कल्याण महामंडळाला सर्व सहकारी व खाजगी कारखान्यातील ऊस गाळपावर प्रति टन दहा रुपये प्रमाणे ऊसतोड कामगार (Sugarcane workers)  कल्याण निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. सहकारी किंवा खाजगी साखर कारखान्याने … Read more

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय: कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या वारसाला 50 हजार देणार

मुंबई – 2019 च्या सुरुवातीच्या संपूर्ण काळात वृत्तपत्रांचे, न्यूज चॅनलचे, समाजमाध्यमांचे ठळक मथळे हे कोरोना महामारीच्या विविध दाखल्यांनी झळकत होते. कोरोनासारख्या (Corona) महामारीने झपाटयाने संपूर्ण जगाला आपल्या मगरमिठीत घेतले होते. आपल्या देशात मजूर, कामगार, लघूउद्योजक यांची संख्या मोठया प्रमाणात आहे. याच गरीब वर्गाला कोरोनाची झळ सर्वाधिक सोसावी लागली. याचा परिणाम देशाच्या अर्थ व्यवस्थेवर झाला. यावेळी … Read more

बैलगाडा शर्यतींवरची बंदी उठवण्याचा निर्णय निर्णय शेतकरी हिताचा – अजित पवार

मुंबई – “राज्यातील बैलगाडा (Bullock cart) शर्यतींवरची बंदी उठविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केले असून हा निर्णय राज्यातल्या शेतकऱ्यांच्या हिताचा, पशुधनाचं संरक्षण, संवर्धन करणारा ठरेल. या निर्णयानं बैलधारक शेतकऱ्यांनी प्रदीर्घ लढाई जिंकली आहे. हा राज्यातल्या शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे. या लढाईत आदरणीय शरद पवार साहेबांनी लक्ष घातलं. मंत्री दिलीप वळसे पाटील, … Read more

मंत्रिमंडळ बैठकीतील मोठे निर्णय : दि. 15 डिसेंबर २०२१

मुंबई – राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात “पुस्तकांचे गाव” साकारण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ (Cabinet) बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्यानुसार भिलारच्या धर्तीवर पुस्तकाचे गाव ही योजना राज्य मराठी विकास संस्थेच्या स्तरावर स्वतंत्रपणे उपक्रम म्हणून राबविण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचे गाव व्हावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार आजच्या बैठकीत … Read more

मंत्रिमंडळ निर्णय: बाजार समित्यांना बळकट करण्यासाठी पणन अधिनियमात सुधारणा करणार

मुंबई – राज्यातील बाजार समित्यांना अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय  झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. यानुसार बाजार समितीवर संचालक निवडून देण्यासाठी ज्या बहुउद्देशिय  सहकारी संस्था त्यांच्या सदस्यांना पीक कर्ज वितरीत करतात त्यांनाच मतदानाचा अधिकार देण्याचे प्रस्तावित करण्यात आले … Read more