गुलकंद खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्ही नक्कीच वाचलेले नसणार…..

गुलाबाच्या फुलापासून तयार केला जाणार गुलकंद खाण्यासाठी चविष्ट तर असतोच मात्र आरोग्यासाठीही त्याचे फायदे होतात. सतत लघवीचा त्रास होत असेल तर गुलकंदाचे सेवन करावे. आयुर्वेदातही गुलकंदाचा वापर प्रामुख्याने अनेक औषधांमध्ये केला जातो. गुलकंदामध्ये व्हिटामिन सी, ई आणि बी भरपूर प्रमाणात असते. याच्या सेवनाने शरीर थंड राहते आणि उन्हाळ्यामुळे होणारा त्रास दूर होतो. जाणून घ्या कसा बनवतात गुलकंद

  • ज्यांना सतत विसरण्याची सवय असते त्यांनी दररोज दुधासोबत एक चमचा गुलकंद खावे. यामुळे मेंदूचे कार्य जलद होते.
  • दररोज गुलकंद खाल्ल्याने त्वचा उजळते. यामुळे रक्त शुद्ध होते. त्यामुळे ब्लॅकहेड्स, पिपल्सच्या समस्या दूर होतात.
  • उन्हाळ्यात अनेकांच्या नाकातून रक्त येते. यातून वाचण्यासाठी उन्हात जाण्याआधी दोन चमचे गुलकंद खा.
  • गुलकंदाच्या सेवनाने शरीरा ताजेतवाने राहते. तसेच गारवा मिळतो. उन्हामुळे येणारा थकवा, आळस, शरीरातील जळजळ दूर होते. शरीराला एनर्जी देणारे हे टॉनिक आहे.
  • रात्री झोपण्यापूर्वी अर्धातास आधी दुधाबरोबर गुलकंद खाल्ल्यास मन शांत होते. दुध आणि गुलकंद मुळे मेंदूतील मेलाटोनिन हार्मोन अधिक प्रमाणात तयार होते व त्यामुळे मन शांत होऊन चांगली झोप लागते.

महत्वाच्या बातम्या –