हिवाळ्यात मध खाण्याचे ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल!

मधातील ग्लुकोज शरीर लगेचच शोषून घेते. ज्यामुळे दिवसभर शरीरात ऊर्जा कायम टिकून राहते. शिवाय,व्यायाम करण्यापूर्वीही अर्धा चमचा मधाचे सेवन करावे, यामुळे थकवा जाणवत नाही. चहा-कॉफीमध्ये साखरऐवजी मधाचा वापर करावा. मधातून सेरोटोनिन रसायन निघते, यामुळे आपली मनःस्थिती चांगली राहण्यास मदत मिळते.

तसेच हिवाळ्यामध्ये सर्दी खोकल्याचा त्रास जवळजवळ सर्वांनाच होतो. मात्र रोग प्रतिकारक शक्ती जास्त असल्यास असे व्हायरल आजार पटकण होत नाहीत. मध खाल्ल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. कफ आणि दम्यासाठी मध खूप रामबाण उपाय आहे.

याचप्रमाणे खाज, खरूज यासारख्या त्वचेसंबंधीत आजारांचा ज्यांना त्रास होतो त्यांनी ग्लासभर पाण्यात एक चमचा मध घालून सकाळी रिकाम्या पोटी प्यावे. त्यामुळे या त्वचा रोगांचा त्रास कमी होतो. कफ आणि दमा यामुळे दूर होतो. आल्यासह मध घेतल्यास खोकल्यात आराम मिळतो.

दरम्यान, केसांच्या आरोग्यासाठीही मध फायद्याचे ठरते. दररोज दोन चमचे मध खालल्यास केसांची चांगली वाढ होते. त्याचबरोबर केस गळण्याची समस्या दूर करण्यासाठीही मधाचे सेवन करणे फायद्याचे ठरते.

महत्वाच्या बातम्या –