अनेकदा घरातील मोठ्या व्यक्ती हळद घातलेलं दूध पिण्याचं सांगतात. या दूधामुळे सर्दी, खोकला दूर होत असल्याचं सांगितलं जातं. पण हे हळद घातलेल्या, हळदीच्या दुधाचे नक्की काय फायदे आहेत?
आयुर्वेदात हळदीचं दूध नैसर्गिकरित्या रक्त शुद्ध करणारं, ब्लड प्युरिफायर मानलं जातं. हे शरीरातील रक्ताभिसरण वाढवते. हळदीच्या दुधात अॅन्टी-इनफ्लेमेटरी तत्व असतात. त्यामुळे आर्थराइटिस, पोटाच्या अल्सरपासून बचाव होतो. लहान मुलांसाठी हळदीचं दूध अतिशय फायदेशीर मानलं जातं. हा कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहे. जो हाडं मजबूत करण्यास मदत करतो. यामुळे ऑस्टियोपोरोसिस सारख्या आजारांपासून बचाव होण्यास मदत होते.
हळदीचं दूध अॅन्टी-मायक्रोबायल आहे. जे बॅक्टेरियल इन्फेक्शन आणि व्हायरल इन्फेक्शनशी लढण्याचं काम करतो. हळदीचं दूध श्वासासंबंधी समस्या दूर करण्यासही मदत करतं. कारण या दूधाच्या सेवनाने शरीरातील तापमान वाढतं, त्यामुळे फुफ्फुस कंजेशन, सायनस, अस्थमा यांसारख्या समस्यांमध्ये फायदा होऊ शकतो.हळदीचं दूध आर्थराइटिसवरही गुणकारी ठरु शकतं. या दुधामुळे आर्थराइटिसमुळे येणारी सूज कमी होण्यास मदत होते.
या दुधामध्ये अॅन्टी-व्हायरल आणि अॅन्टी-बॅक्टेरियल गुण असतात. जे सर्दी, खोकला आणि घशाच्या दुखण्यापासून आराम देण्यास मदत करतात. मासिक पाळीदरम्यान होणारा त्रासही या दुधाने कमी केला जाऊ शकतो. मासिक पाळीवेळी होणारा त्रास थांबवण्यासाठी, कोणत्याही गोळ्या घेण्याऐवजी एक ग्लास हळदीचं दूध पिणं फायदेशीर ठरु शकतं. स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी हळदीचं दूध अतिशय फायदेशीर मानलं जातं.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज
- सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये उद्या अतिमुसळधार पावसाची शक्यता
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा
- मुतखड्याची लक्षणे व त्यावरील ‘हे’ घरगुती आहे उपाय, माहित करून घ्या
- ई-पीक पाहणी मोबाईल ॲपमध्ये पीक पाहणी कशी नोंदवावी? घ्या जाणून
- राज्यात ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; तर ‘या’ जिल्ह्यांना ऑरेन्ज अलर्ट जारी