ई-पीक पाहणी मोबाईल ॲपमध्ये पीक पाहणी कशी नोंदवावी?
- गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ई-पीक पाहणी मोबाईल ॲप डाऊनलोड करून नोंदणी करावी.
- पीक पेरणीची माहिती सदरामध्ये जमिनीचा भूमापन क्र./स नं /गट क्रमांक निवडावा.
- जमिनीचा गट क्रमांक निवडाल त्यावेळी तुमच्या जमिनीचे एकूण क्षेत्र व पोट खराबा याबाबत सर्व माहिती दर्शविली जाईल.
- हंगाम निवडामध्ये खरीप किंवा संपूर्ण वर्ष या पैकी हंगाम निवडू शकता.
- पीक पेरणीसाठी (लावणीचे) उपलब्ध क्षेत्र दर्शविले जाईल.
- पिकांच्या वर्गामध्ये एक पीक पद्धती, मिश्र पीक, पॉलीहाउस पीक, शेडनेटहाउस पीक, पड क्षेत्र यापैकी योग्य पर्याय निवडावा.
- जमीन मिळकतीमध्ये निर्भेळ पीकांची नोंद करण्यापूर्वी जमिनीत कायम पड क्षेत्र असल्यास, प्रथम कायम पड जमिनीची नोंदणी करावी.
- पीकांचा वर्ग निर्भेळ पीक निवड केल्यानंतर निर्भेळ पीकाचा प्रकार पीक व फळपीक पर्याय दिसतील. त्यातील योग्य पर्याय निवडावा.
- पीक पर्याय निवडून शेतातील पीकाचे नाव निवडून क्षेत्राची नोंद करावी. फळपीक पर्याय निवडल्यास फळ झाडांची संख्या व क्षेत्र नमूद करावे.
- मिश्र पीक निवडल्यानंतर पिके आणि क्षेत्र नमूद करावे. मिश्र पिकाचे क्षेत्र नमूद करताना त्यातील घटक पिकाने व्यापलेल्या क्षेत्राचे प्रमाणात विभागून टाकावे. त्यातील घटक पिकांच्या क्षेत्राची बेरीज एकूण क्षेत्रापेक्षा जास्त होवू नये.
- चालू हंगामामध्ये जमीन शेत पिकाखाली येत नसल्यास किंवा लागवड केली नसल्यास अशावेळी चालू पड क्षेत्र निवड करावे.
- जल सिंचनाचे साधन पर्यायाखाली पिकांना पाणी देण्यासाठी ज्या सिंचन साधनाचा उपयोग करत आहात तो पर्याय निवडता येईल.
- त्यानंतर सिंचन पद्धत निवडायची आहे. ठिबक सिंचन, तुषार सिंचन, प्रवाही सिंचन किंवा अन्यप्रकारे यापैकी एक पर्याय निवडणे अपेक्षित आहे.
- शेतकरी या ठिकाणी पीक पेरणी केलेला/लागवड केलेल्या पीकांचा दिनांक नमूद करतील.
महत्वाच्या बातम्या –
- मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय : दि. ८ सप्टेंबर २०२१
- सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ निमित्त राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी
- राज्यात एकाच दिवसात तब्बल ‘इतक्या’ नागरिकांचे झाले लसीकरण
- मंत्रिमंडळ मोठा निर्णय: महानिर्मिती राज्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची जोरदार पाऊस सुरुच; तर ‘या’ भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा