मुंबई – मागील वर्षापासून असलेल्या कोरोना (Corona) प्रार्दुभावामुळे शाळा, कॉलेज बंद होते. मात्र सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने पुन्हा एकदा शाळा, कॉलेज सुरु करण्यात आले. मात्र इयत्ता पहिली ते चौथी शाळा सुरु करण्यात आल्या नाहीत. मात्र आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबतची मह्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सोशल डिस्टन्सिंग ठेवून सुरू करायला परवानगी द्यावी, अशी टास्क फोर्सने माहिती दिली आहे. पहिली ते चौथी सुरू करण्यास हरकत नसल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाने म्हटले आहे. राज्यात ९८ टक्के रिकव्हरी रेट आहे. मुलं गंभीर स्वरुपात आजारी पडल्याचे प्रमाण कुठेही दिसले नाही. त्यामुळे पालकांनी चिंता करण्याची काळजी नाही.
शाळेच्या व्यवस्थापनाला योग्य काळजी घेऊन शाळा सुरू कऱण्याची परवानगी देण्याबाबत विचार सुरू आहे. त्याबाबत मुख्याध्यापकाच्याद्वारे पालकांचे समुपदेशन करण्याचा प्रयत्न करू, याबाबतचा निर्णय कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्यात येईल, असं टोपे म्हणाले.
पहिली ते चौथीपर्यंत काही अटी-शर्तीवर शाळा सुरू करायला पाहिजे, असंही टास्क फोर्सने सांगितलं. याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा देखील शाळा सुरू करण्याबाबत प्रस्ताव आहे. तसेच राज्य सरकार देखील शाळा सुरू करण्याच्या विचारात असल्याचे टोपे म्हणाले. आज मुख्यमंत्री आणि कॅबिनेटच्या बैठकीत यासंदर्भातील अंतिम निर्णय होणार आहे. व्हिडीओ कॉलद्वारेही चर्चा होणार असून लवकरच यावर निर्णय घेतला जाईल, असही राजेश टोपे म्हणाले.
- आनंदाची बातमी – एलपीजी गॅस सिलिंडरवरील अनुदान पुन्हा सुरू
- राज्यातील ‘या’ भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता\
- सावधान! पुढील 24 तासांत राज्यातील ‘या’ भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता
- ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘शरद शतम् योजना’; टास्क फोर्सचा अहवाल सादर
- बियाणे प्रक्रिया व साठवण केंद्र उभारणी योजनेचा लाभ घेण्याचे दादाजी भुसे यांचे आवाहन