पुणे बाजार समितीच्या सलग दोन दिवसांच्या सुट्ट्यांनंतर सोमवारी भाजीपाल्याची आवक वाढेल असा अंदाज होता. मात्र, भाजीपाल्याची १३०, कांद्याची १२५ आणि बटाट्याची ५० ट्रक आवक झाली.
खानदेशात कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक वाढली
बटाट्याचे आडतदार राजेंद्र कोरपे म्हणाले, की सलग दोन दिवसांच्या बंदमुळे बटाट्याची मोठ्या आवकेची शक्यता होती. मात्र ‘वंचित’च्या बंदनंतर सर्वच बाजार समित्यांमध्ये आवक झाल्याने पुण्यातील आवक संतुलित राहिली.
खानदेशात लाल कांद्याची आवक वाढली
कांदा आवकेबाबत विलास रायकर म्हणाले, की शुक्रवारी वंचित विकास आघाडीच्या बंदमुळे सोलापूर बाजार समिती बंद असल्याने कांद्याची सुमारे ३२५ ट्रक आवक झाली होती. मात्र, शनिवारी पुणे बाजार बंद असल्याने आवक सोलापूरला मोठ्या प्रमाणावर वाढली. त्यामुळे दक्षिण भारतातील व्यापाऱ्यांनी सोलापूरमधून कांदा खरेदी केला. सोमवारी पुण्यात १२५ ट्रक कांद्याची आवक झाली. या वेळी कांद्याला २८० ते ३०० रुपये दहा किलोपर्यंत दर होता.
शेतकऱ्याला लुटणारे आरोपी अवघ्या १२ तासात जेरबंद https://t.co/gS8hSi52L7
— KrushiNama (@krushinama) January 29, 2020