भाजलेले चणे खाण्याचे ‘हे’ फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल!

भाजलेले चणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. भाजलेले चणे खाल्यास बद्धकोष्ठता दूर होते. तसेच भाजलेले चणे वीर्य वाढविण्यास मदत करते. भाजलेल्या चण्यांमध्ये कॅल्शियम असते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. प्रत्येक वयोगटातील लोकांना दररोज भाजलेल्या चण्यांचे सेवन करणे फायदेशीर ठरते. बाजारात भाजलेले चणे दोन प्रकार उपलब्ध असतात. एक साली सह आणि एक सोललेले चणे. सोलल्याशिवाय चणे सेवन करणे अतिउत्तम.

भाजलेले चण्यांमध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, कॅल्शियम, लोह आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात आढळतात. डॉक्टरांच्या मते, निरोगी व्यक्तीने दररोज 50 ते 60 ग्रॅम चणे खायलाच पाहिजे. हे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असते. रोग प्रतिकारशक्ती वाढवते. जर तुम्ही दररोज न्याहारीमध्ये किंवा दुपारच्या आधी 50 ग्रॅम भाजलेले चणे खाल्ल्यास, शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. वाढत्या प्रतिकारशक्तीमुळे, रोगांशी सामना करण्यास मदत होते. हवामान बदलल्यास बहुतेक वेळा शारीरिक त्रास देखील होतो. अशावेळी चणे मदत करतात.

  • रोगप्रतिकार क्षमता वाढते – दररोज नाश्ता करताना किंवा दुपारी जेवणाच्या आधी ५० ग्राम चणे खाण्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. रोगप्रतिकारशक्ती वाढल्याने अनेक आजारांपासून बचाव होतो. त्याशिवाय बदलत्या हवामानानुसार होणाऱ्या शारिरीक समस्याही दूर होतात.
  • मधुमेहासाठी फायदेशीर – मधुमेही रुग्णांसाठीही भाजलेले चणे गुणकारी आहेत. भाजलेले चणे ग्लूकोजचं प्रमाण धरुन ठेवतं त्यामुळे मधुमेहही नियंत्रणात राहतो. मधुमेहींनी दररोज भाजलेले चणे खाण्याने ब्लड-शुगर लेवल कमी होते.
  • पचनशक्ती वाढवते – भाजलेले चणे पचनशक्ती संतुलित करण्याचं काम करतात. चण्यामुळे रक्त शुद्ध होतं. त्यामुळे त्वचा तजेलदार होण्यासही फायदा होतो. चण्यामध्ये फॉस्फरस असतं, ज्यामुळे हिमोग्लोबिन वाढतं आणि किडनीतील अतिरिक्त मीठही निघून जातं.
  • वजन कमी करते – भाजलेले चणे खाल्याने वजन कमी होण्यास मदत होते. भाजलेल्या चण्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी वितळण्यास मदत होते.
  • बद्धकोष्ठता – ज्यांना बद्धकोष्ठताची समस्या आहे, त्यांना दररोज चणे खाल्याने फायदा होतो. बद्धकोष्ठता शरीरातील अनेक आजारांचे मूळ कारण ठरते. बद्धकोष्ठता असल्यास दिवसभर आळसपणा, अस्वस्थ जाणवते.

महत्वाच्या बातम्या –