पुणे : सध्या कृषी विभागाअंतर्गत कृषी सहायक हे पद अस्तित्वात आहेच, पण शेतीक्षेत्रासाठीच उपयुक्त ठरणाऱ्या या पदाकडून नियमित सेवा ग्रामीण भागात उपलब्ध होत नाही. शासनाच्या कृषीविषयक योजनांची शेतकऱ्यांना माहिती देण्याचे प्रमुख काम या कर्मचाऱ्याकडून होते. शिवाय, कृषी शिबिरांचे आयोजन, माती परीक्षण, गरजेनुसार शेतीपिकांची पाहणी व अहवाल, अशाच कामांची जबाबदारी या कृषी सहायकावर असते. ही कामे कृषी सहायकाकडून केले जात असल्याने अनेक गावांतील शेतकऱ्यांना त्याचे दर्शनही होत नाही, पण या कर्मचाऱ्याविषयी ओरडही होत नाही. कारण, शेतकरी या पदाकडून होणाऱ्या कार्याबाबत अनभिज्ञच आहे.
कृषी विभागाला गावाशी जोडणारे कृषी सहायक गावातच राहायला हवेत, पण मात्र ते गावात येतच नाहीत. कृषी सहायक हे महिना महिना गावात येत नाहीत. त्यामुळे आम्हाला योजनांबद्दल माहित नाही . योजनांमध्ये भ्रष्टाचार होतो, योजना पोचतच नाहीत, गावातच तुम्ही त्यांना हजेरीसाठी बायोमेट्रिक सुरू करा , अशा तीव्र स्वरूपाच्या तक्रारी नेटकरी शेतकऱ्यांनी समाजमाध्यमांवर केल्या आहेत. याशिवाय त्यांनी कृषी सहायकांची रिक्त पदे भरण्याचेही आवाहन केले आहे.
कृषिमंत्र्यांनी बुधवारी (ता. ५) अकोला येथे कृषी अधिकाऱ्यांच्या बैठकीत, कृषी सहायकांनी आठवड्यात किमान तीन दिवस गावात गेलेच पाहिजे. त्यावेळी कृषी विभागाचे कर्मचारी आमच्या गावात येऊन योजनांची माहिती देतात, असे शेतकऱ्यांनी सांगितले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.
त्यामुळे नेटकरी शेतकऱ्यांनी ‘कृषी विभागाला गावाशी जोडणारे कृषी सहायक गावातच रहायला हवेत असा आग्रह धरला. तसेच ते मात्र गावात येतच नाही , महिना महिना ते तोंड दाखवत नाहीत , अशा तीव्र स्वरूपाच्या तक्रारी केल्या आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी कृषी सहायकांच्या रिक्त जागा भरण्याचे आवाहनही केले आहे.
महत्वाच्या बातम्या –
जाणून घ्या कशी करावी मोगरा फूलपिक लागवड
जाणून घ्या प्रवासादरम्यान येणाऱ्या उल्टीवर उपाय
सहकारी गृहनिर्माण संस्थांचे कामकाज अधिक सुलभ आणि पारदर्शक – सुभाष देशमुख
कर्जमुक्ती योजनेच्या व्हिडिओतील छेडछाडीची शासनाकडून गंभीर दखल; चौकशीचे आदेश