Budget २०२२: राज्यातील शेतकऱ्यांना केंद्रीय अर्थसंकल्पात काय अपेक्षा आहेत?

नवी दिल्ली –  येणाऱ्या अर्थसंकल्पात (Budget) राज्यातील शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा होणार याकडे आता सगळ्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला या अवकाळी पावसामुळे  राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट आले आहे. तसेच खतांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे.  यामुळे आता शेती करायची तरी कशी असा प्रश्न … Read more

राज्यातील ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा १० ते ३१ जानेवारीपर्यंत बंद

नाशिक दिनांक – कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता जिल्ह्यातील 10 वी व 12 वी चे वर्ग वगळून सर्व शाळा (School) सोमवार 10 ते 31 जानेवारीपर्यंत बंद राहतील. त्याचप्रमाणे लसीकरणाचा वेग वाढवून, दुसरा डोस घेण्यासाठी विविध माध्यमातून जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. … Read more

उद्योग आणि सेवा क्षेत्रांच्या नवीन गरजा लक्षात घेऊन प्रशिक्षणावर भर – नवाब मलिक

पुणे – राज्यातील उद्योग आणि सेवा क्षेत्रांच्या नवीन गरजा लक्षात घेत काळानुरुप अभ्यासक्रम आणि प्रशिक्षणांवर भर देण्यात येत आहे. राज्यातील सर्व आयटीआयमध्ये अशाच पद्धतीने प्रशिक्षण आणि त्यानंतर खात्रीचा रोजगार उपलब्ध होण्याच्यादृष्टीने कौशल्य विकास विभागामार्फत निर्णय घेण्यात आल्याचे राज्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. औंध येथील शासकीय प्रशिक्षण संस्थेच्या नवीन लॅबचे … Read more

‘महाबॅंके’कडून जिल्ह्यातील ५८२ महिला बचत गटांना ८ कोटी १३ लक्ष रुपयांचे कर्ज वाटप

अमरावती – बचत गटांमुळे महिला सक्षम बनत असून त्यांच्यामध्ये वित्तीय साक्षरताही वाढत आहे. महिलांना बचत गटांसाठी सुलभ कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रचा पुढाकार प्रशंसनीय असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री ॲङ यशोमती ठाकूर यांनी काढले. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे बँक ऑफ महाराष्ट्र व महिला आर्थिक वितरण महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गटांना उद्योग निर्मितीसाठी … Read more

साखर उत्पादनाबरोबरच सह उत्पादनांकडे विशेष लक्ष द्यावे – दिलीप वळसे- पाटील

पुणे – राज्यातील साखर कारखान्यांनी साखर उत्पादनाबरोबरच सह उत्पादनांच्या निर्मितीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. इथेनॉल, सहवीज निर्मिती, आसवनी प्रकल्प, औद्योगिक रसायने आदींच्या उत्पादनातून कारखान्यासोबतच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीमध्ये हातभार लावावा, असे आवाहन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांनी केले. कासारसाई (ता. मुळशी) येथील संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या चोविसाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ श्री. वळसे-पाटील यांच्या हस्ते … Read more

जनतेला उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळतील याकडे लक्ष द्या – एकनाथ शिंदे

पुणे – लोकप्रतिनिधींनी आपल्या भागातील रस्ते, पिण्याचे पाणी, स्वच्छता संबंधित विकासकामे करणे अपेक्षित आहेत; त्याच पद्धतीने जनतेला उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळेल याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, असे मत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. महंमदवाडी, हडपसर येथील पुणे महानगर पालिकेच्या कै. दशरथ बळीबा भानुगरे रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण तसेच परिसरातील विविध विकासकामांचे लोकार्पण, भूमिपूजन … Read more

केस धुण्याआधी लक्षात ठेवा ‘या’ महत्वाच्या गोष्टी, जाणून घ्या

केसांचं पोषण होणं गरजेचं आहे. अनेकदा पोषण न झाल्यानं केस गळण्यासारखे प्रकार समोर येतात. त्यामुळे केसांची काळजी घेणं गरजेचं आहे. अनेकदा केस धुतल्यानंतर केसांना कंडिशनिंग केलं जातं. पण जेवढ केस धुतल्यानंतर केसांचं पोषण होणं गरजेचं आहे. तितकच केस धुण्याच्या आधीही त्याचं पोषण होणं गरजेचं आहे. अनेकदा केस धुण्याआधी केसांना तेलाने मसाज केला जातो. तेल लावल्याने … Read more